अमेरिकेला मोठा धक्का! उत्तर कोरियाने रेल्वेतून डागली दोन मिसाईल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

north korea

अमेरिकेला मोठा धक्का! उत्तर कोरियाने दोन क्षेपणास्त्रे डागली

नवीन निर्बंधांना बगल देत उत्तर कोरियाने (north korea) शुक्रवारी रेल्वेतून दोन क्षेपणास्त्रे डागून अमेरिकेला (america) मोठा धक्का दिला. स्थानिक माध्यमांनी शनिवारी ही माहिती दिली. दक्षिण कोरियाच्या लष्कराने सांगितले की, शुक्रवारी दुपारी उत्तर कोरियाने दोन कमी पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला. दोन्ही क्षेपणास्त्रे रेल्वेच्या माध्यामातून डागण्यात आली.

उत्तर कोरियाची या महिन्यात तिसरी क्षेपणास्त्र चाचणी

KCNA या वृत्तसंस्थेनुसार, उत्तर कोरियाने सप्टेंबर 2021 मध्ये पहिल्यांदा ट्रेनमधून क्षेपणास्त्राची चाचणी केली. जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफने सांगितले की शुक्रवारच्या मिसाईलने 36 किलोमीटरच्या उंचीवर 430 किलोमीटर (270 मैल) अंतर कापले. 5 आणि 11 जानेवारीला हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांच्या दोन यशस्वी चाचण्यांनंतर उत्तर कोरियाची या महिन्यात तिसरी क्षेपणास्त्र चाचणी होती.

जपानच्या तटरक्षक दलाने सांगितले की

याबाबत जपानचे पंतप्रधान कार्यालय आणि संरक्षण मंत्रालयानेही उत्तर कोरियाची चाचणी बॅलेस्टिक क्षेपणास्त्र असल्याचे सांगितले. जपानच्या तटरक्षक दलाने सांगितले की, एक संशयित वस्तू या भागात पडली. तटरक्षक दलाने कोरियन द्वीपकल्प आणि जपान, तसेच पूर्व चीन समुद्र आणि उत्तर पॅसिफिक दरम्यान कार्यरत जहाजांना पुढील माहितीचे निरीक्षण करण्याचे आवाहन केले आहे

हेही वाचा: UP elections : निवडणूक आयोगाची कारवाई, पोलीस निरीक्षक निलंबित

उत्तर कोरियाचा कारवाईचा इशारा

अमेरिकेच्या नव्या निर्बंधानंतर उत्तर कोरियाने कारवाईचा इशारा दिला आहे. उत्तर कोरियाने आपल्या चाचण्यांवरून देशावर नवीन निर्बंध लादल्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनावर जोरदार निशाणा साधला आहे आणि अमेरिकेने आपल्या संघर्षाची भूमिका कायम ठेवल्यास कठोर आणि स्पष्ट कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

हेही वाचा: मुंबईत 14 कोटींचं चरस जप्त; तस्करीचं काश्मीर कनेक्शन

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top