मुंबईत 14 कोटींचं चरस जप्त; तस्करीचं काश्मीर कनेक्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

मुंबईत 14 कोटींचं चरस जप्त; तस्करीचं काश्मीर कनेक्शन

मुंबई - मुंबईच्या (Mumbai) गुन्हे शाखा पोलिसांनी ऑक्टोंबर २०२१ मध्ये दहिसर परिसरात कारवाई करत अंमली (Drugs) पदार्थाची विक्री करणाऱ्या एका कुटुंबाचा पर्दाफाश केला होता. या कारवाईत पोलिसांनी २४ किलोचं १४ कोटी रुपयांच चरस जप्त केलं होतं. बंडू उडनशिवे (वय ५२) त्याची पत्नी क्लेरा (वय ५२), मुलगी सिंथिया (वय २३) आणि जावई जसर जहांगीर शेख (वय २४) यांना या प्रकरणी अटक केली होती. मात्र या टोळीला काश्मिरमधून चरस पुरवणाऱ्या मुख्य आरोपी गुलजार मकबूल अहमद खान (वय ४२) याला गुन्हे शाखा ६ च्या पोलिसांनी श्रीनगर (Shrinagar police) पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे.

हेही वाचा: अकोला : आर्थिक मदतीसाठी २५ जानेवारीपर्यंत अर्ज करा!

विशेष म्हणजे हा आरोपी ज्या श्रीनगरच्या (Kashmir) मगरमल बाग परिसरात राहतो. हा परिसर अतिसंवेदनशील आहे. तसेच या परिसरात दहशतवाद्यांचा (Terrorist) वावर असल्याने मुंबई पोलिसांना संरक्षणासाठी स्थानिक पोलिस ठाण्यातील १०० काश्मिरी पोलिसांची मदती घ्यावी लागली होती. (Crime news) दरम्यान, या परिसरात मोठ्या प्रमाणात चसर तस्करी होत असून यांचा संबध नार्को टेरिरिझमसाठी असल्याचे चौकशीत समोर आले आहे. मात्र आरोपींच्या यादीत गुलजारचे नाव नव्हते. मुंबई पोलिसांनी (Mumbai police) त्याला ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात अटक केल्याने काश्मिर पोलिसांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. काश्मिरी चरस दर्जेदार असल्याने बाजारात नेहमीच त्याला मोठी मागणी असते. मोठ्या प्रमाणात पैसे कमवण्यासाठी आरोपी चरस तस्करीकरून पैसे कमवण्यासाठी हा धोका पत्करत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

हेही वाचा: लॉकडाऊनमध्ये विजेच्या निर्मितीसाठी राज्यावर २ हजार कोटींचे कर्ज

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top