North Korea
North KoreaeSakal

North Korea : अमेरिकेची न्यूक्लिअर पाणबुडी साऊथ कोरियाजवळ पोहोचताच नॉर्थ कोरियाने केला हल्ला; दोन क्षेपणास्त्रे डागली

या मिसाईल्स सुमारे ५५० किलोमीटर दूर जाऊन पडल्या.

अमेरिकेने गेल्या ४० वर्षांमध्ये पहिल्यांदाच दक्षिण कोरियाजवळ आपली न्यूक्लिअर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असलेली पाणबुडी नेली आहे. दक्षिण कोरियाच्या समुद्रकिनाऱ्याजवळ ही पाणबुडी पोहोचताच उत्तर कोरियाने दोन क्षेपणास्त्रं लाँच केली. यामुळे या क्षेत्रात तणाव वाढला आहे.

नॉर्थ कोरियाने आपल्या पूर्व किनाऱ्यावरून बुधवारी (१९ जुलै) पहाटे ३.३० आणि ३.४६ वाजता दोन शॉर्ट रेंज बॅलिस्टिक मिसाईल सोडल्या. या मिसाईल्स सुमारे ५५० किलोमीटर दूर जाऊन पडल्या. दक्षिण कोरियामधील वृत्तसंस्थांनी याबाबत माहिती दिली.

North Korea
Zombie Drug Videos : झॉम्बी ड्रगचा कहर वाढला! अमेरिकेतील तरुण पिढी होतेय बरबाद; भयानक व्हिडिओ समोर

हल्ल्याचा निषेध

साऊथ कोरियाच्या जॉईंट चीफ्स ऑफ स्टाफने (जेसीएस) या हल्ल्याबाबत माहिती दिली. या हल्ल्याचा तीव्र निषेधही त्यांनी केला. उत्तर कोरियाने केलेलं हे कृत्य चिथावणीखोर आहे. केवळ कोरियन द्विपकल्पच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील शांततेला हानी पोहोचवणारं हे कृत्य आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या ठरावाचे हे स्पष्ट उल्लंघन असल्याचं जेसीएसने म्हटलं आहे.

अमेरिका-दक्षिण कोरिया मैत्री

दक्षिण कोरिया आणि अमेरिकेची नौदलं उत्तर कोरियाच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेऊन आहेत. मंगळवारीच या दोन्ही देशांमध्ये न्यूक्लिअर कन्सल्टेटिव्ह ग्रुपची (NGC) पहिली बैठक पार पडली. यामध्ये दक्षिण कोरियाच्या मदतीसाठी अमेरिकेच्या अण्वस्त्रांसह संपूर्ण लष्करी ताकदीचा वापर करण्याच्या वचनबद्धतेला बळकटी मिळाली. यानंतर लगेच उत्तर कोरियाने हा हल्ला केला आहे.

North Korea
Crude Oil :रशियाने वाढवल्या तेलाच्या किमती , स्वस्त तेलासाठी मोदी सरकार या देशाशी करणार हातमिळवणी

दरम्यान, उत्तर कोरियाच्या या मिसाईल्स जपानच्या आर्थिक क्षेत्राबाहेर पडल्या. तसंच या मिसाईल्समुळे कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं नसल्याची माहिती जपानने दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com