उत्तर कोरिया जगासाठी डोकेदुखी ः डोनाल्ड ट्रम्प

पीटीआय
शनिवार, 27 मे 2017

रोम : शेजारी देशांसाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी उत्तर कोरिया ही एक मोठी समस्या बनली आहे. मात्र, असे असले तरी हा प्रश्न आम्ही सोडवू, असा विश्वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज व्यक्त केला.

रोम : शेजारी देशांसाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी उत्तर कोरिया ही एक मोठी समस्या बनली आहे. मात्र, असे असले तरी हा प्रश्न आम्ही सोडवू, असा विश्वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज व्यक्त केला.

इटलीतील ताओरमिना येथे आयोजित "जी-7' परिषदेपूर्वी ट्रम्प यांनी जपानचे पंतप्रधान शिंझो ऍबे यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर ट्रम्प हे पत्रकारांशी बोलत होते. मागील आठवड्यातच ट्रम्प यांनी उत्तर कोरियाचे अध्यक्ष कोम जॉंग उन यांच्यावर जोरदार टीका केली होती.

उत्तर कोरिया हा आता जगासमोरील गंभीर प्रश्न बनला आहे. मात्र, त्यावर उत्तर शोधले जाईल, असे ट्रम्प म्हणाले. हा प्रश्न नेमका कसा सोडवणार, याबाबत ट्रम्प यांनी या वेळी कुठलीही माहिती दिली नाही.

Web Title: north korea headache for world donald trump