Kim Jong Un Daughter : उत्तर कोरियाच्या हुकुमशाहाची मुलगी पहिल्यांदाच आली जगासमोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kim Jong Un Daughter

Kim Jong Un Daughter : उत्तर कोरियाच्या हुकुमशाहाची मुलगी पहिल्यांदाच आली जगासमोर

उत्तर कोरियाचे हुकूमशाहा असलेले किम जोंग उन हे नेहमी चर्चेत असतात. पण त्यांची कौटुंबिक माहिती सहसा जगासमोर कधी आली नाही. पण सध्या पहिल्यांदा त्यांच्या मुलीचा चेहरा जगासमोर आला आहे. मिसाईल परिक्षणाच्या वेळी ते आपल्या मुलीला सोबत घेऊन आले असताना त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत.

(North Korea Kim Jong Un Daughter Photo Viral)

हेही वाचा - महापाषाणयुगीन दगडी स्मारकामध्ये दडल्या आहे समृद्ध संस्कृतीच्या खुणा....

दरम्यान, केसीएनए या वृत्तसंस्थेने सांगितले की, शुक्रवारी उत्तर कोरियाच्या बॅलेस्टिक मिसाईलचे परिक्षण झाले. तर यावेळी किम जोंग उन हे आपल्या मुलीसोबत उपस्थित होते असं वृत्त रॉयटर्सने दिलं आहे. यावेळी तिने आपल्या वडिलांचे हात पकडले होते. पांढऱ्या जॅकेटमध्ये ती दिसून आली. पण तिचे नाव अजून समोर आले नाही.

हेही वाचा: Video Viral : याला म्हणतात नेतृत्व! कुत्रा दाखवतोय चक्क गायींना वाट

Kim Jong Un Daughter

Kim Jong Un Daughter

अधिक माहितीनुसार, किम जोंग उन यांना तीन मुले आहेत. त्यामध्ये दोन मुली आणि एका मुलाचा सामावेश आहे. तर २०१३ मध्ये सेवानिवृत्त स्टार डोनिस यांनी सांगितलं की, किम जोंग उन यांच्या एका मुलीचं नाव जू ए आहे. पण त्याची अधिकृत माहिती समोर आली नसून त्यांच्या एका मुलीचा चेहरा पहिल्यांदाच जगासमोर आला आहे.