उत्तर कोरियाने केली शक्तीशाली ICBM क्षेपणास्त्राची चाचणी.

हे क्षेपणास्त्र जापानच्या दक्षिण समुद्रात पडल आहे.
Kim Jong Un
Kim Jong Unsakal

उत्तर कोरियाने आतापर्यंतच्या सर्वात लांब पल्ल्याच्या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी केलीय. उत्तर कोरियाला अणवस्त्रधारक देश म्हणून मान्यता देण्यात यावी यासाठी अमेरिकेवर दबाव वाढवण्यासाठी उत्तर कोरिया सातत्याने क्षेपणास्त्रांची चाचणी घेतय. संपूर्ण जग युक्रेन -रशिया यांच्यातील युद्धामुळे चिंतीत असताना, उत्तर कोरियाने मात्र या वर्षातील बारावी क्षेपणास्त्र चाचणी केलीय.

Kim Jong Un
धोनीने कॅप्टन्सी सोडल्यानंतर रैनाने केले ट्विट, म्हणाला...

उत्तर कोरियाचे शेजारिल देश दक्षिण कोरिया आणि जापानच्या संरक्षण दलाने हे क्षेपणास्त्र समुद्राकडे डागण्यात आले असून, हे आंतरखंडीय क्षेपणास्त्र असण्याची शक्यता वर्तिविली आहे. हे क्षेपणास्त्र जापानच्या दक्षिण समुद्रात पडल आहे. शस्त्रसंपन्न देश बनविण्यासाठी किम जोंग उन याने एकामागोमाग क्षेपणास्त्र चाचण्या करण्याचा धडाका लावलाय. ICBM (Intercontinental Ballistic Missile) प्रतिबंधित प्रकाराच्या क्षेपणास्त्रांची चाचणी मोठी बाब मानली जाते. नेमक्या कोणत्या प्रकारच्या क्षेपणास्त्रांची चाचणी केली गेली याबद्दल उत्तर कोरियाने अद्याप माहीती दिलेली नाही. २०१७ नंतर पहिल्यांदाच इतक्या शक्तीशाली आणि लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची चाचणी झाल्याचं दक्षिण कोरिया आणि जापानकडून सांगण्यात आलंय.

Kim Jong Un
जग तिकडे युद्धात व्यस्त; इकडे किम जोंग ऊननी केलं मिसाईलचं परीक्षण

यापुर्वी दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे-इन यांनी, उत्तर कोरियाची बॅलेस्टीक क्षेपणास्त्रांची चाचणी म्हणजे कोरियन द्विपकल्पाला आणि जगालाही धोका असल्याचं म्हंटल होतं. अमेरिका,जापान आणि अमेरिकेने या क्षेपणास्त्र चाचणीचा निषेध केलाय. साउथ कोरियन वेळेनुसार ४ वाजून २५ मिनिटांनी हे मिसाईल दक्षिण कोरियाच्या समुद्रावर होतं.अशी माहीती दक्षिण कोरियाने दिलीय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com