
धोनीने कॅप्टन्सी सोडल्यानंतर रैनाने केले ट्विट, म्हणाला...
महेंद्रसिंह धोनीने (MS Dhoni) आयपीएलचा 15 वा हंगाम सुरू होण्यापूर्वी दोन दिवस आधी आज ( दि. 24) कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. धोनीनंतर आता चेन्नईचा नवा कर्णधार रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) असणार आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जने कर्णधार (CSK Captain) बदलल्याची घोषणा केल्या नंतर लगेचच धोनीचा सीएसकेमधील जुना सहकारी सुरेश रैनाने (Suresh Raina) ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सुरेश रैनाने ट्विट करून नवा कर्णधार रविंद्र जडेजाला शुभेच्छा दिल्या 'माझ्या भावासाठी मी खूप उत्साही आहे. आम्ही दोघे ज्या फ्रेंचायजीमध्ये मोठे झालो त्या फ्रेंचायजीचे नेतृत्व आता तो करणार आहे. सीएसकेसाठी यापेक्षा चांगला पर्याय असू शकत नाही. जडेजा तुला शुभेच्छा. हा एक रोमांचित करणारा टप्पा आहे. मला आशा आहे की तू सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करशील.'
हेही वाचा: हंगामाची सुरूवात होण्यापूर्वीच धोनीने अचानक कॅप्टन्सी सोडली
हेही वाचा: IPLवर दहशतवादाचं सावट नाही; मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण
चेन्नई सुपर किंग्जने रिटेन्शनवेळीच धोनी ऐवजी आपल्या पहिल्या पसंतीचा खेळाडू म्हणून रविंद्र जडेजाची निवड केली होती. त्यानंतर धोनीने 14 वर्षे सांभाळलेले सीएसकेची कॅप्टन्सी आयपीएलचा 15 वा हंगाम सुरू होण्यापूर्वीच रविंद्र जडेजाकडे सोपवली. धोनीच्या नेतृत्वात सीएसकेने 4 वेळा आयपीएलचे टायटल जिंकले होते. गेल्या हंगामात सीएसकेने आपले चौथे विजेतेपद पटकावले होते. धोनीने सीएसकेकडून एकूण 204 सामने खेळले आहेत. त्यातील 121 सामन्यात संघाने विजय मिळवला आहे. तर 82 सामन्यात सीएसकेला पराभव सहन करावा लागला होता.
Web Title: Suresh Raina Tweeted After Ms Dhoni Handed Over Csk Captaincy
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..