किम जोंग उनची तब्येत खालावली! हुकूमशहा एका महिन्यापासून 'बेपत्ता' I North Korea | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kim Jong Un

किम जोंग यांना शेवटचं 12 ऑक्टोबर रोजी पाहिलं गेलं होतं.

किम जोंग उनची तब्येत खालावली! हुकूमशहा एका महिन्यापासून 'बेपत्ता'

उत्तर कोरिया : उत्तर कोरियाचा (North Korea) हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) एका महिन्याहून अधिक काळ सार्वजनिक ठिकाणी दिसलेला नाहीय. त्यामुळं जगाचं याकडं लक्ष लागून राहिलंय. किम आजारी असल्याचं वृत्त काही वाहिन्यांकडून देण्यात येत आहे. मात्र, हे कितपत खरं आहे, याची साशंकता आहे. 2014 नंतर सर्वात जास्त काळ किम बेपत्ता होण्याचं आजारपण हे कारण आहे. त्यादरम्यान हुकूमशहा सार्वजनिक ठिकाणी दिसला नव्हता आणि देशाच्या कारवायांपासून स्वतःला दूर ठेवलं होतं. आता पुन्हा किम जोंग उन बेपत्ता झाल्याचं वृत्त समजतंय.

किम जोंग यांना शेवटचं 12 ऑक्टोबर रोजी पाहिलं गेलं होतं. एक दिवस आधी ते राजधानी प्योंगयांगमध्ये (Pyongyang) क्षेपणास्त्र प्रदर्शनात उपस्थित होते, अशी माहिती सरकारी माध्यमांनी दिलीय. मात्र, त्यानंतर किमच्या दिसण्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. आतापर्यंत किम उत्तर कोरियामध्ये कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसलेला नाही. वॉशिंग्टनच्या वॉचडॉग वेबसाइट एनके वृत्तानुसार, किम हे प्योंगयांगमधील वॉनसन बीचच्या कडेला असलेल्या घरात असल्याचं समजतंय. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

हेही वाचा: तालिबान्यांच्या दहशतीनं 3 लाख लोक अफगाणिस्तानातून पळाले इराणला

ऑक्टोबरच्या शेवटी किम वॉनसन बीचच्या तलावात बोट फिरवताना दिसले होते, असं सांगण्यात येत आहे. उत्तर कोरियाचे सैन्य लष्करी कारवायांमध्ये व्यस्त असताना किम गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. असं मानलं जात, की जर किम जोंग गंभीर आजारी नसतील, तर ते पुढील महिन्यात सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लागण्याची शक्यता आहे. त्यांचे वडील किम जोंग-इल (Kim Jong-il) यांच्या पुण्यतिथीला म्हणजे, 17 डिसेंबर रोजी त्यांच्या समाधीला ते भेट देऊ शकतात. 2021 मध्ये 37 वर्षीय किम 14 दिवस आठ वेळा बेपत्ता झाले होते.

हेही वाचा: इजिप्त : राजा फराओच्या भव्य मंदिराचे जुने अवशेष सापडले

loading image
go to top