'स्क्विड गेम'ची कॉपी विकणाऱ्याला मृत्यूदंड; पाहणाऱ्याला जन्मठेप | Netflix Squid Game | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Netflix Squid Game

'स्क्विड गेम'ची कॉपी विकणाऱ्याला मृत्यूदंड; पाहणाऱ्याला जन्मठेप

काही दिवसांपासून नेटफ्लिक्स सीरीज स्क्विड गेम (Netflix Squid Game) सध्या खूप गाजत आहे, जगभरातील लाखो लोक ही सीरीज पाहात आहेत, दरम्यान नेटफ्लिक्सवरील स्क्विड गेम या सिरीजच्या पायरेटेड विकल्याच्या आरोपाखाली एका व्यक्तीला थेट मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे ती कॉपी विकत घेणाऱ्या एका कॉलेजच्या विद्यार्थ्यास जन्मठेप तर शिक्षकांनाही शिक्षा सुनावण्यात आली. वाचा नेमके काय आहे प्रकरण..

उत्तर कोरियामध्ये (North Korea) तसेच प्रकरणामध्ये या व्यक्तीला फायरिंग स्व्काडच्या समोर उभ करत त्याला मृत्यूदंड देण्यात येणार आहे. याच प्रकरणात आरोपीला मदत करणाऱ्यांना देखील जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर काही जणांवर बेकायदेशीरपणे शो पाहिल्याबद्दल जन्मठेप आणि सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. रेडिओ फ्री एशियाने दिलेल्या वृत्तानुसार या सीरीजची पायरेटेड कॉपी त्या व्यक्तीने चीनमधून उत्तर कोरियामघ्ये आणली होती, त्याने USB फ्लॅश ड्राइव्हमध्ये शोच्या प्रती विकल्याचा आरोप आहे.

दरम्यान ही फ्लॅश ड्राइव्ह विकत घेतल्याबद्दल एका विद्यार्थ्याला थेट जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तर इतर सहा जणांना शो पाहण्यासाठी पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. इतकेच नाही तर शाळेतील शिक्षक आणि प्रशासकांना निलंबीत करुन शिक्षा म्हणून हद्दपार करत थेट खाणीत काम करायला पाठवण्यात आले आहे.

हेही वाचा: तुमची डिझेल कार कनव्हर्ट करा इलेक्ट्रिकमध्ये; जाणून घ्या पध्दत

गेल्या आठवड्यात सुरू झाले जेव्हा एका हायस्कूलच्या विद्यार्थ्याने गुपचुप नेटफ्लिक्सवर रिलीज झालेली दक्षिण कोरियन ड्रामा सीरीज स्क्विड गेम असलेली USB फ्लॅश ड्राइव्ह विकत घेतली आणि वर्गातील त्याच्या मित्रासोबत ती पाहिली इतर विद्यार्थ्यांसोबत फ्लॅश ड्राइव्ह शेअर केली. उत्तर कोरियामध्ये कायद्याने देश, विशेषत: यूएस आणि दक्षिण कोरियामधील शो पाहणे, बाळगणे किंवा वितरित करणे यासाठी जास्तीत जास्त मृत्यूदंडाची तरतूद आहे.

कोरियन डायस्टोपियन शो ‘स्क्विड गेम’ सध्या जगभरात धूम सुरु आहे. पदार्पणानंतर तो नेटफ्लिक्सवरील आजपर्यंतच सर्वात हिट वेब सिरिज ठरली आहे.17 सप्टेंबर रोजी प्रीमियर झालेल्या या दक्षिण कोरियन सर्व्हायव्हल ड्रामाला अलीकडेच OTT प्लॅटफॉर्मवर 111 मिलीयन व्ह्यूज मिळाले आहेत. पैशामुळे हताश झालेले गरिबी आणि कर्जाने त्रस्त लोक एक मोठ्या बक्षिसाच्या अपेक्षेने या गेममध्ये सहभागी होतात. त्यासाठी आपला जीव धोक्यात घालतात. यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्मातून एक आभासी जग निर्माण केले गेले. 456 खेळाडूंमध्ये ही स्पर्धा चालते. अशी स्विड गेमची एकंदर कथा आहे.

हेही वाचा: एकाच वेळी लॉन्च झाले 4 नवे इलेक्ट्रिक स्कूटर; किंमतही बजेटमध्ये

loading image
go to top