एकाच वेळी लॉन्च झाले 4 नवे इलेक्ट्रिक स्कूटर; किंमत देखील बजेटमध्ये | Electric Scooter | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

greta electric scooters

एकाच वेळी लॉन्च झाले 4 नवे इलेक्ट्रिक स्कूटर; किंमतही बजेटमध्ये

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

गुजरातमधील इलेक्ट्रिक वाहन कंपनी ग्रेटा इलेक्ट्रिकने (Greta Electric) भारतीय बाजारपेठेत त्यांच्या चार नवीन इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) लॉन्च केल्या आहेत. कंपनीच्या या स्कूटर्समध्ये Harper, Evespa, Glide आणि Harper ZX यांचा समावेश आहे. भारतात त्यांची किंमत ६० हजार ते ९२ हजार रुपयांच्या दरम्यान आहे. या ई-स्कूटर्समुळे तुम्हाला आकर्षक कलर, डिझायनर कन्सोल आणि मोठी स्टोरेज स्पेस मिळेल असा कंपनीचा दावा आहे. विशेष बाब म्हणजे एकदा चार्ज केल्यास स्कूटरला 70 ते 100 किमी पर्यंत चालवता येते.

काय आहेत खास फीचर्स

या सर्व इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये दिवसा रनिंग लाईट, EBS, रिव्हर्स मोड, ATA सिस्टम, स्मार्ट शिफ्ट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर डिस्प्ले, कीलेस स्टार्ट आणि अँटी थेफ्ट अलार्म असे फीचर्स मिळतात. ग्रेटा इलेक्ट्रिक स्कूटर्सचा दावा आहे की, एका चार्जवर 100 किमी पर्यंतच्या राइडिंग रेंजसह कंफर्टेबल राइडिंग आणि बेस्ट परफॉर्मन्स देतात. हे इलेक्ट्रिक स्कूटर्स 48V/60V लिथियम-आयन बॅटरीने चालतात. कंपनी ई-स्कूटरसाठी बॅटरी पॅक निवडण्याचा ऑप्शनही देत ​​आहे. ग्रेटा इलेक्ट्रिक स्कूटरचा दावा आहे की ई-स्कूटर 0 पासून पूर्णपणे चार्ज होण्यासाठी सुमारे चार तास लागतील.

हेही वाचा: लवकरच स्मार्टफोन बनणार तुमची 'युनिव्हर्सल ओळख'; UIDAI चे काम सुरु

Greta Harper, Evespa आणि Harper ZX मॉडेल्सना ड्रम डिस्क ब्रेक मिळतात, तर ग्लाइड ड्युअल डिस्क हायड्रॉलिक ब्रेक्स देले आहेत. ई-स्कूटर 22 वेगवेगळ्या कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. सर्व स्कूटरमध्ये वेगवेगळी बॉडी स्टाइल आणि युनिक कलर ऑप्शन्स देण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, हार्पर आणि हार्पर ZX ला फ्रंट ऍप्रन, शार्प बॉडी पॅनेल्स आणि स्लीक टर्न सिग्नल्ससह स्पोर्टी प्रोफाइल मिळते. दोघांमधील सर्वात मोठा फरक हा आहे की हार्परला ड्युअल हेडलॅम्प युनिट मिळते तर हार्पर ZX ला सिंगल हेडलॅम्प मिळतो.

हँडलबार काउल, रियर व्ह्यू मिरर आणि दोन्ही स्कूटरची सीट आणि बॅकरेस्ट यांसारखी इतर फीचर्स मोठ्या प्रमाणात सारखीच आहेत. Evespa ही एक रेट्रो-स्टाईल इलेक्ट्रिक स्कूटर आहे जी पेट्रोल इंजिन असलेल्या Vespa स्कूटरसारखी दिसते. हा क्लासिक फ्लॅट फ्रंट ऍप्रॉन, कर्व्ही बॉडी पॅनल्स, गोल हेडलॅम्प आणि राउंड रियर व्ह्यू मिररसह येते. पुढच्या ऍप्रनवर टर्न सिग्नल दिलेले आहेत.

हेही वाचा: कमी बजेटमध्ये 7 सीटर फॅमिली कार शोधताय? हे आहेत बेस्ट ऑप्शन्स

loading image
go to top