उत्तर कोरियाकडून बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

वृत्तसंस्था
शनिवार, 9 जुलै 2016

सेऊल - उत्तर कोरियाने आज (शनिवार)पूर्व किनाऱ्यावर पाणबुडीवरून बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याचा दावा, दक्षिण कोरियातील अधिकाऱ्यांनी केला आहे. 

सेऊल - उत्तर कोरियाने आज (शनिवार)पूर्व किनाऱ्यावर पाणबुडीवरून बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याचा दावा, दक्षिण कोरियातील अधिकाऱ्यांनी केला आहे. 

दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार, उत्तर कोरियाने पूर्वेकडील सिनपो किनाऱ्यावर आज सकाळी स्थानिक वेळेनुसार सकाळी 11.30 वाजता या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. उत्तर कोरियाने पाणबुडीवरून क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यामुळे शेजारील राष्ट्रांना धोका निर्माण झाला आहे. उत्तर कोरियापासून संरक्षण करण्यासाठी आम्ही अमेरिकेच्या साथीने तंत्रज्ञान विकसित करणार आहोत.

उत्तर कोरिया अण्वस्त्रे बनविण्याच्या तयारीत आहेत. संयुक्त राष्ट्र संघाकडून यावर बंदी घालण्यात आली आहे. उत्तर कोरिया कोणत्याही प्रकारच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञान बनवू शकत नाही, असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र संघाने ठेवला आहे.

Web Title: North Korean submarine ballistic missile test 'fails'