क्षेपणास्त्र चाचणीत उत्तर कोरियाला अपयश

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 मार्च 2017

सोल - उत्तर कोरियाने आज घेतलेली क्षेपणास्त्र चाचणी अपयशी ठरली असल्याची माहिती दक्षिण कोरिया आणि अमेरिकेकडून देण्यात आली.

अमेरिकेवर हल्ला करण्याची धमकी देत उत्तर कोरियाने दोन आठवड्यांपूर्वी चार बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी घेतली होती. उत्तर कोरियाकडून आज पुन्हा एकदा क्षेपणास्त्र चाचणी घेण्यात आली, मात्र ही चाचणी अपयशी ठरली असल्याचा दावा दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्‍त्याने दिली. उत्तर कोरियाने नेमक्‍या कुठल्या प्रकारच्या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली, याचा शोध घेतला जात असल्याचेही प्रवक्‍त्याने स्पष्ट केले.

दरम्यान, उत्तर कोरियाने आज घेतलेली क्षेपणास्त्र चाचणी अपयशी ठरल्याचे अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयातर्फे स्पष्ट करण्यात आले. क्षेपणास्त्राचा प्रक्षेपणानंतर काही वेळातच स्फोट झाला, असे अमेरिकेने म्हटले आहे. या महिन्याच्या सुरवातीला उत्तर कोरियाने चार बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी घेतली होती. या चार क्षेपणास्त्रांपैकी तीन क्षेपणास्त्रे जपानच्या अतिशय जवळ पडली होती. जपानमधील अमेरिकी लष्कराच्या तळावर हल्ला करण्याची ही रंगीत तालीम होती अशी शक्‍यता व्यक्त केली जात आहे. मागील काही दिवसांपासून उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचण्यांचा धडाका लावला असून, त्यामुळे त्या देशावरील निर्बंधांमध्ये वाढ करण्यात आली होती. मात्र, तरीही आपला अण्विक कार्यक्रम थांबविण्यास उत्तर कोरियाने नकार दिला आहे.

Web Title: North Korea's missile test failed