Earthquake
Sakal
रविवारी संध्याकाळी उत्तर जपानमध्ये ६.७ तीव्रतेचा भूकंप झाला आणि त्यानंतर अनेक धक्के बसले. जपान हवामान संस्थेच्या म्हणण्यानुसार, भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. एजन्सीने सांगितले की, भूकंप इवाते प्रांताच्या किनाऱ्याजवळ सुमारे १० किमी खोलीवर झाला. आतापर्यंत या भागातील दोन अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये नुकसान किंवा बिघाड झाल्याचे कोणतेही वृत्त नाही.