अभिमानास्पद! अभूतपुर्व योगदानाबद्दल स्पेसक्राफ्टला दिले कल्पना चावलाचे नाव

kalpana chawala
kalpana chawala

वॉशिंग्टन - अंतराळात जाणारी भारतीय वंशाची पहिली महिला कल्पना चावलाचा मोठा सन्मान झाला आहे. एयरोस्पेस कंपनी नॉर्थरोप ग्रुमॅनने आपल्या लॉंच होणाऱ्या सिग्नस स्पेसक्राफ्टचे नाव भारतीय वंशाच्या पहिल्या महिला अंतराळवीर कल्पना चावला यांच्या नावावरुन ठेवण्यात येणार आहे. हे स्पेसक्राफ्ट सिग्नस स्पेसक्राफ्टच्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरुन २९ सप्टेंबरला सोडले जाईल. 

सिग्नस स्पेसक्राफ्टचे निर्माते नॉर्थरोप ग्रुममॅन यांनी एका ट्विटद्वारे ही घोषणा केली आहे. आज आम्ही कल्पना चावलाचा सन्मान करतो आहोत. नासामध्ये भारतीय वंशाच्या पहिल्या अंतराळवीर म्हणून ज्यांनी इतिहास घडवला आहे. मानवी अंतराळ यानात त्यांचे योगदान महत्वपूर्ण राहीले असून त्यांचा विशेष प्रभाव पडला आहे. भेटा आमच्या आगामी सिग्नस यान कल्पना चावलाला.

नॉर्थरोप ग्रुममॅन म्हणाले की, या कंपनीची ही परंपरा आहे की, प्रत्येक सिग्नसचे नाव अशा एका व्यक्तीच्या नावे ठेवले जात आहे की ज्याने मानवी अंतराळ यान मोहीमेत महत्वपूर्ण भुमिका बजावलेली असेल. कल्पना चावला यांना अंतराळात जाणाऱ्या भारतीय वंशाच्या पहिला महिला यादृष्टीने आम्ही त्यांना निवडले आहे. 

१६ जानेवारी २००३ रोजी अमेरीकी अंतराळ यान कोलंबियाच्या चालक गटाच्या भारतीय वंशाच्या सदस्या म्हणून त्या अंतराळात गेल्या होत्या. १ फेब्रुवारी २००३ ला अंतराळात १६ दिवसांचा प्रवास पुर्ण करुन त्या परतत असताना नियोजित लॅंडीगच्या १६ मिनीट आधी दक्षिण अमेरीकेत अंतराळ यानाला कोलंबियामध्ये अपघात झाला. या अपघातात कल्पना चावलासहित सर्व अंतराळवीरांना आपले प्राण गमवावे लागले. त्यानंतर तीन वर्षांनी सुनिता विल्यम्स ही २००६ मध्ये अंतराळात जाणारी भारतीय वंशाची दुसरी महिला ठरली. 

१७ मार्च १९६२ रोजी हरियाणातील करनाल या गावी कल्पना चावला यांचा जन्म झाला होता. लहानपणापासूनच त्यांना आकाश इतकं आवडायचे की त्या विमानाचे चित्र सतत काढायच्या. २० वर्षाच्या असताना त्या अमेरीकेला गेल्या आणि तिथे त्यांनी एरोस्पेस इंजिनियरींगचा अभ्यास सुरु केला. त्यांना पहिल्यांदाच १९ नोव्हेंबर १९९७ मध्ये अंतराळात जायची संधी मिळाली. त्यांच्या एकूण कामावर प्रभावित होऊन त्यांना १६ फेब्रुवारी २००३ साली अंतराळात पाठवले गेले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com