लस टोचल्यानंतर आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू; नॉर्वेमध्ये खळबळ

टीम ई सकाळ
Friday, 15 January 2021

नॉर्वेच्या मेडिसिन एजन्सीचे मेडिकल डायरेक्टर स्टीनर मॅडसन यांनी सांगितलं की, आम्हाला याची माहिती घ्यावी लागेल की व्हॅक्सिनमुळे त्यांचा मृत्यू झाला की हा फक्त योगायोग आहे. 

नॉर्वे - जगातील अनेक देशांमध्य़े कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणाला सुरुवात झाली आहे. यामध्ये काही लशींना आपत्कालीन वापरसाठी परवानगी देण्यात आली आहे. भारतातही 16 जानेवारीपासून कोरोनाच्या लशीकरणाला सुरुवात होणार आहे. दरम्यान, नॉर्वेत फायजरची व्हॅक्सिन टोचल्यानंतर 23 जणांचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे.

नॉर्वेच्या मेडिसिन एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये 13 वृद्धांवर व्हॅक्सिनचे दुष्परिणाम झाले ते गंभीर स्वरुपाचे होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. नॉर्वेच्या इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थने सांगितलं की,'दुर्धर आजार असलेल्या लोकांवर लशीचे गंभीर परिणाम होऊ शकतात.'

हे वाचा - पाकिस्तानची नाचक्की! मलेशियानं जप्त केलं प्रवासी असलेलं विमान

नॉर्वेने आतापर्यंत 33 हजार लोकांना व्हॅक्सिन दिलं आहे. देशात त्या लोकांकडे लक्ष दिलं जात आहे ज्यांना कोरोनाचा अधिक धोका आहे. यापैकी बहुतांश लोकांना बायोएनटेक, फायजर व्हॅक्सिन देण्यात आली आहे. याशिवाय मॉडर्नाची व्हॅक्सिनही दिली आहे. 

दोन आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मृत्यूची चौकशी सध्या नॉर्वेमध्ये सुरु आहे. या दोघांनाही फायजर आणि बायोएनटेकची लस देण्यात आली होती. नॉर्वेच्या मेडिसिन एजन्सीचे मेडिकल डायरेक्टर स्टीनर मॅडसन यांनी सांगितलं की, आम्हाला याची माहिती घ्यावी लागेल की व्हॅक्सिनमुळे त्यांचा मृत्यू झाला की हा फक्त योगायोग आहे. 

हे वाचा - ‘डब्लूएचओ’चे पथक वुहानमध्ये

मॅडसन असेही म्हणाले की, वृद्धांना कोरोना व्हॅक्सिन देण्यात आले होते आणि त्यांचा मृत्यू हा एक योगायोगही असू शकतो. याआधी फायजर कंपनीचे सीईओ अल्बर्ट बोरला यांनी म्हटलं होतं की, व्हॅक्सिन घेतल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग रोखता येईल की नाही हे सांगता येणार नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Norway 13-people-dead-after-corona-vaccination report