
तेरा जणांचे हे पथक सिंगापूरहून थेट येथे दाखल झाले. कोरोना बाधित आढळल्याने पथकातील दोन जणांना सिंगापूरमध्येच थांबावे लागले. वुहानमध्ये पोचलेल्या पथकाला १४ दिवस विलगीकरणात रहावे लागणार आहे.
वुहान - कोरोना विषाणूच्या उगमाबाबत तपास करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांचे पथक आज वुहान येथे पोहोचले. या पथकाला प्रवेश देण्यात चीनने अनेक दिवस टाळाटाळ केली होती. तेरा जणांचे हे पथक सिंगापूरहून थेट येथे दाखल झाले. कोरोना बाधित आढळल्याने पथकातील दोन जणांना सिंगापूरमध्येच थांबावे लागले. वुहानमध्ये पोचलेल्या पथकाला १४ दिवस विलगीकरणात रहावे लागणार आहे.
हे वाचा - अख्खं गावच करावं लागलं सील; हिमाचल प्रदेशात सर्वात मोठी कारवाई
विषाणूच्या उगमाचा शोध घेणे ही शास्त्रीय प्रक्रिया असून अशा प्रकारचा तपास इतरही देशांमध्ये घ्यायला हवा, अशी मागणी चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी केली आहे. चीनमध्ये असा तपास करावा की नाही यावर बरेच वाद होऊन, सर्वच बाजूंनी दबाव वाढल्यावर आधी जागतिक आरोग्य संघटनेने आणि नंतर चीनने यासाठी परवानगी दिली.
हे वाचा - Army Day: भारतीय मेजरनं बनवलं जगातील पहिलं यूनिवर्सल बुलेटप्रूफ 'शक्ती' जॅकेट