आता सौदीत महिलांना एकट्याने करता येणार परदेशवारी

आता सौदीत महिलांना एकट्याने करता येणार परदेशवारी

रियाध : सौदी अरेबियात महिलांच्या दृष्टीने कायद्यात अनेक चांगले बदल केले जात आहे. यात आता 18 वर्षांपेक्षा जास्त वयांच्या महिला पुरुषांच्या संरक्षकाविना एकट्याने परदेशात प्रवास करू शकणार आहेत. तसा कायदाच सौदीत केला आहे. 
तेल उत्पादनामुळे जगातील सर्वांत श्रीमंत देश असलेल्या सौदी अरेबियात महिलांवर अनेक बंधने आहेत.

देशात महिलांना माणसांसारखी वागणूक दिली जात नसल्याची टीका जगभरातील मानवाधिकार संघटना करतात. त्यामुळे सौदीच्या प्रतिमा डागाळली आहेत. यातून बाहेर पडण्यासाठी सौदीतील राजवटीने काही वर्षांपूर्वीपासून प्रयत्न सुरू केले आहेत. क्रीडांगणावर जाऊन फुटबॉलचे सामने पाहणे, मोटार चालविणे याला परवानगी देण्यात आली आहे. याचबरोबर आता महिल्या एकट्या परदेशात जाऊ शकणार आहेत.

तसा कायदा मंजूर करण्यात आला असून, याच वर्षापासून तो लागू होण्याची अपेक्षा आहे. या कायद्यानुसार सौदीतील 18 वर्षांवरील कोणत्याही वयोगटातील महिला पुरुषाच्या साथीशिवाय एकटी परदेश प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे. 21 वर्षे वयोगटातील पुरुषांनाही हा नियम लागू आहे. 

मुक्त जीवनाची आस 

सौदी अरेबियात शरणार्थींच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. सात वर्षांत शरणार्थींच्या संख्येत चौपट वाढ झाली आहे. 2012 मध्ये 195 शरणार्थींची नोंद झाली होती. ही संख्या 2017 पर्यंत 815 वर पोचली आहे. सौदी शरणार्थींमध्ये पुरुष व महिलांचाही समावेश आहे. या शरणार्थींप्रमाणेच स्वच्छंदी, मुक्त जीवन जगण्याची इच्छा सौदीच्या मूळ नागरिकांमध्ये निर्माण होत आहे.

सौदीतील नियमांमधील शिथिलता याच कारणांमुळे होत असल्याचे सांगितले जात आहे. देशात हळूहळू महिलांना पुरुषांप्रमाणे अधिकार मिळू लागले असले तरी काही बाबतीत मात्र महिलांवर कडक बंधने आहेत. याचे उदाहरण म्हणजे पुरुषाच्या संमतीविना महिला विवाहाचा निर्णय घेऊ शकत नाही. 

सौदी अरेबियातील सुधारणा 

जुलै 2012 ः सौदीच्या महिला क्रीडापटूचा ऑलिंपिकमध्ये समावेश 
जून 2013 ः महिलांसाठी देशात क्रीडा संकुलाचे उद्‌घाटन 
डिसेंबर 2015 ः निवडणुकांमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार 
फेब्रुवारी 2017 ः महिलांच्या नावाने स्वतंत्र पासपोर्ट 
मे 2017 ः शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रांत महिलांच्या संख्येत वाढ 
जुलै 2017 ः महिलांसाठी शारीरिक शिक्षण खुले 
जानेवारी 2018 ः मैदानावर प्रवेशास महिलांना परवानगी 
फेब्रुवारी 2018 ः लष्करात भरती व स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास महिलांना अनुमती 
मार्च 2018 ः बुरखा घालण्याचे बंधन शिथिल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com