Coronavirus : जगभरात वाढलीये कोरोनाग्रस्तांची संख्या; मृतांची संख्येतही वाढ, सध्या...

Coronavirus : जगभरात वाढलीये कोरोनाग्रस्तांची संख्या; मृतांची संख्येतही वाढ, सध्या...

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता युरोप, अमेरिका, भारत, इटली, चीनसह इतर अनेक देशांत कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. यापूर्वी चीनमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सर्वाधिक होती. मात्र, आता अमेरिकेत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याची माहिती समोर आली आहे. 

संपूर्ण जगात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. यापूर्वी चीनमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक होते. त्यानंतर इटलीमध्ये याचा फैलाव मोठ्या प्रमाणात दिसून आला होता. मात्र, आता या दोन्ही देशानंतर अमेरिकेत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सर्वाधिक झाली आहे. इतर देशांच्या तुलनेत अमेरिकेत सर्वाधिक 1,04,142 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. 

जगभरात 5,97,185 कोरोनाबाधित 

संपूर्ण जगाला कोरोनाने विळखा घातला आहे. जगभरात आत्तापर्यंत 5,97,185 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 27,359 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच जगभरात 1,33,360 रुग्ण कोरोनावरील उपचार करुन बरे झाले आहेत. 

सर्वाधिक मृत्यू इटलीमध्ये

अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या जगात सर्वाधिक असली तरीदेखील मृतांची संख्या ही इटलीमध्येच मोठ्या प्रमाणात आहे. सध्या इटलीमध्ये 9,134 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. तर इटलीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 86,498 झाली आहे. 

अमेरिकेत कोरोनाबाधितांचा आकडा लाखांवर

अमेरिकेत सध्या 1,04,142 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. ही संख्या चीन, इटलीच्या तुलनेत सर्वाधिक आहे. तसेच यातील मृतांची संख्या 1,696 वर गेली आहे. तर 2,463 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे. यातील विशेष बाब म्हणजे 2,522 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून, ते बरेही झाले आहेत. 

चीनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या कमी

चीनपासून सुरुवात झालेल्या या कोरोनाच्या रुग्णांची संख्या इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. या देशात 81,394 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. तर चीनमध्ये 3,295 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com