Russia Ukraine War : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कीचा डान्स व्हिडिओ व्हायरल

युक्रेन सध्या युद्धामुळं होरपळ असून अनेक देशांनी युक्रेनला पाठिंबा जाहीर केला आहे.
Ukraine President Volodymyr Zelenskiy Refuse to Leave Capital Kyiv
Ukraine President Volodymyr Zelenskiy Refuse to Leave Capital Kyivesakal

युक्रेनमध्ये सध्या युद्धजन्य (Ukraine War) परिस्थिती असताना युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलिडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) हे वारंवार चर्चेत येत आहेत. आताही या युद्धाच्या पार्श्वभूमीवर स्टार अभिनेत्रींसोबतचा झेलेन्स्की यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. (Old video of president Volodymyr Zelenskyy from Dancing with the Stars goes viral amid Russia-Ukraine crisis)

झेलेन्की हे राजकारणात येण्यापूर्वी चांगले अभिनेते होते. त्यामुळं त्यांनी अनेक टीव्ही शोज आणि सिनेमांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. विषेशतः विनोदी अभिनेते म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. सन २००६ मध्ये ते यशाच्या शिखरावर होते. दरम्यान, त्यांनी एका डान्स रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी स्टार्स अभिनेत्रीसोबत डान्स केल्याचा एका व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. ओलेना शॉप्तेन्को या आपल्या डान्स पार्टनरसोबत त्यांच्या डान्सची एक व्हिडिओ क्लीप सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल झाली आहे. यामध्ये झेलेन्स्की यांनी अप्रतिम डान्स स्टेप्स केल्यानं ते सध्या इंटरनेटवर जबरदस्त चर्चेत आहेत. विशेष म्हणजे या आपल्या पहिल्याच डान्स रिअॅलिटी शोमध्ये ते विजेतेही ठरले होते.

राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या या डान्सची क्लीप सोशल मीडियावर अपलोड झाल्यानंतर तिला जवळपास १ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. त्यांचा डान्स बघितल्यानंतर नेटिझन्स गप्प बसू शकत नव्हते त्यामुळं त्यांनी आपले विचार आणि मतांचा कमेंट्समध्ये अक्षऱशः पाऊस पाडला. एका युझरनं तर म्हटलं की, मला याचं आजिबात आश्चर्य वाटत नाही की, झेलेन्स्की हे त्याकाळी अनेक महिलांचे क्रश असतील. दुसऱ्या एका युझरनं कमेंटमध्ये म्हटलं की, खरोखरचं असं काही आहे का? जे ही व्यक्ती करु शकत नाही.

युक्रेनमध्ये सध्या युध्दामुळं प्रचंड तणावाची परिस्थिती आहे. २४ फेब्रुवारीपासून रशियानं युक्रेनविरोधात युद्ध पुकारलं आहे. या युद्धात अमेरिकेसह सर्व युरोपियन देश युक्रेनच्या बाजूनं आहेत तर रशिया आंतरराष्ट्रीय स्तरावर काहीसा एकटा पडला आहे. भारत आणि चीन सारख्या देशांनी अद्याप कोणाचीही बाजू घेतलेली नसून तटस्थ राहणं पसंद केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com