राफेल बनवणाऱ्या कंपनीचे मालक ओलिवियर दसॉल्ट यांचा हॅलीकॉप्टर क्रॅशमध्ये मृत्यू

Olivier Dassault,
Olivier Dassault,

पॅरिस- एका हॅलीकॉप्टर दुर्घटनेत फ्रान्सचे अब्जाधीश आणि संसद सदस्य ओलिवियर दसॉल्ट यांचा मृत्यू झाला आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती इम्यनुएल मॅक्रॉन यांनी ट्विट करुन यासंबंधीची माहिती दिली आहे. दसॉल्ट 69 वर्षाचे होते. ते फ्रान्सचे अब्जाधीश सर्ज दसॉल्ट यांचे सर्वात मोठे पुत्र होते. दसॉल्ट ग्रुप युद्ध विमानांचे निर्माण करते, शिवाय ग्रुपचे फिगारो नावाचे एक वृत्तपत्रही आहे. मॅक्रोन यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, ओलिवियर दसॉल्ट फ्रान्सवर प्रेम करायचे. त्यांनी उद्योग, कायदे निर्माण, निवडणूक अधिकारी, वायु सेना कमांडर म्हणून देशाची सेवा केली आहे. त्यांचे असे अचानक जाणे देशासाठी मोठी हानी आहे. स्थानिक माध्यमांनी यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. 

ओलिवियर 2002 मध्ये रिपब्लिक पक्षाचे आमदार होते. त्यांना दोन भाऊ आणि एक बहीण आहे. ते परिवाराचे उत्तराधिकारी होते. त्यांचे आजोबा मार्सेल एक वैमानिक इंजिनियर आणि प्रतिष्ठित शोधकर्ता होते. त्यांनी पहिल्या महायुद्धात फ्रान्सच्या विमानामध्ये वापरले जाणारे एक प्रोपेलर विकसित केले होते. ते आज जगभरात प्रसिद्ध आहे. 

दुर्घटनेदरम्यान ऑलिवियर सुट्टीवर होते. 2020 फॉर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीनुसार, दसॉल्ट यांना त्यांचे दोन भाऊ आणि एका बहिणीसोबत जगातील 361 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती सांगण्यात आलं होतं. राजकारणात प्रवेश केल्याने त्यांनी दसॉल्ट बॉर्डमधून आपलं नाव वापस घेतलं होतं.  दरम्यान, दुर्घटनेत ओलिवियर दसॉल्ट यांच्यासह त्यांच्या वैमानिकाचाही मृत्यू झाला आहे. त्यांच्या अशा अचानक जाण्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com