Astrazeneca
Astrazeneca

ॲस्ट्राझेनेकाचा एक डोस सर्वाधिक परिणामकारक

‘लॅन्सेट’मधील लेखातील निरीक्षण; लसीकरणातील तीन महिन्यांचे अंतर जास्त सुरक्षित 
लंडन - कोरोनाव्हायरसच्या प्रतिबंधासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेलीॲस्ट्राझेनेका लशीच्या दोन डोसांमध्ये अंतर सहा आठवड्यांपेक्षा तीन आठवडे असल्यास ती अधिक परिणामकारक ठरत आहे. या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीतील निष्कर्षात ही नोंद केली आहे.

यासंदर्भातील शोधनिबंध ‘लॅन्सेट’ या वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. ॲस्ट्राझेनेका लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर तीन महिन्यांपर्यंत ७८ टक्के संरक्षण मिळते. यामुळे डोसांमधील अंतर जास्त असले तरी चालू शकते आणि जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण वेगाने करणे शक्य होऊ शकते, असे या लेखात म्हटले आहे. ‘लॅन्सेट’ने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत निवेदनात या शोधनिबंधाचे मुख्य लेखक आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातील प्राध्यापक प्रा. ॲड्रयू पोलार्ड यांनी म्हटले आहे की, जेव्हा लशीचा पुरवठा कमी असेल तेव्हा पहिल्या टप्प्यात मर्यादित लोकांना दोन डोस देण्याऐवजी जास्तीत जास्त लोकांना एक डोस दिल्यास मोठ्या लोकसंख्येला संरक्षण मिळू शकते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

या अभ्यासासाठी ब्रिटनमधील आठ हजार ९४८,  ब्राझीलमधील सहा हजार ७५३  आणि दक्षिण आफ्रिकेतील एक हजार ४७७ अशा एकूण १७ हजार १७८ लोकांच्या चाचणीमधून मिळालेली माहिती एकत्रित केली आहे. चाचणीत १८ वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयोगटातील स्वयंसेवकांनी भाग घेतला. त्यातील आठ हजार ५९७ जणांना दोन प्रमाणित डोस किंवा आठ हजार ५८१ स्वयंसेवकांना नियंत्रित लस देण्यात आली. ब्रिटनमधील चाचणीत एक हजार ३९६ नागरिकांना लशीचा पहिला डोस कमी प्रमाणात देण्यात आला. लशीच्या एका डोसाचा परिणाम पाहण्यासाठी घेतलेल्या चाचणीत ज्यांनी पहिला डोस घेतला व दुसरा डोस घेण्यास नकार दिला आणि ज्यांना एक डोस घेतल्यानंतर आणि दुसरा डोस घेण्याआधी कोरोनाचा संसर्ग झाला, अशा लोकांचा समावेश केला होता. 

दुसरा डोस घेणे श्रेयस्कर
पोलार्ड म्हणाले की, चाचणीतील निरीक्षणे जास्तीत जास्त तीन महिन्यांपुरती असल्याने लशीचा एका डोसाचा प्रभाव त्यानंतर किती टिकतो, याची निश्‍चित कालावधी समजू शकलेला नाही. यासाठी लशीचा दुसरा डोस घेणे श्रेयस्कर आहे. यामुळे दीर्घकाळाचा विचार करता दुसऱ्या डोसामुळे प्रतिकार क्षमता जास्त काळ राहू शकते. ज्यांनी आधी लस घेतली आहे, त्यांनी दुसरा डोसही घ्यावा, अशी शिफारस आम्ही करत आहोत.

अभ्यासातील निरीक्षणे...

  • दोन प्रमाणित डोसांमधील अंतर आणि परिणामकारता 
  • बारा किंवा त्यापेक्षा जास्त आठवड्यांच्या डोस दिलेले स्वयंसेवक सर्वाधिक सुरक्षित (८१ टक्के) 
  • सहा आठवड्यांपेक्षा कमी अंतराने दोन डोस दिलेल्यांना कमी संरक्षण (५५ टक्के)

एक डोसची परिणामकारता

  • लस घेतल्यापासून २२ दिवस किंवा तीन महिन्यांपर्यंत ७६ टक्के प्रभावी
  • तीन महिन्यांनंतरही याचा प्रभाव टिकून राहतो
  • ‘सार्स-सीओव्ही-२’च्या स्पाइक प्रोटिनविरोधातील प्रतिपिंडाची पातळीही अबाधित राहते

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com