Video: चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेनं गलवान संघर्षाचा व्हिडिओ शेअर केला अन् चीनचं पितळ पडलं उघडं!

वृत्तसंस्था
Saturday, 20 February 2021

बर्फाच्छादित काराकोरम पर्वत रांगेतील एका नदीकिनारी हा प्रकार घडला होता. चीनी सैनिक आणि भारतीय सैनिक आक्रमक झाल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.

Galwan Valley clash: नवी दिल्ली : भारत (India) आणि चीन (China) या शेजारी-शेजारी राष्ट्रांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून तणावाचे वातावरण होते. गेल्यावर्षी गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये रक्तरंजित धुमश्चक्री उडाली होती. या घटनेचा एक व्हिडिओ आता चीनची सरकारी वृत्तसंस्था असलेल्या ग्लोबल टाईम्सने प्रसिद्ध केला आहे. आणि त्यामुळे आता चीनचं पितळ उघडं पडलं आहे. 

चीनच्या संरक्षण मंत्रालयाने या चकमकीत ठार झालेल्या सैनिकांची नावे जाहीर केली असून २० भारतीय सैनिकांना टिपल्याचा दावाही केला आहे. पण हा हल्ला चीनने नाही, तर भारतानेच केल्याचे चीनने म्हटले आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत असून भारतानेच हा हल्ला केल्याचा आरोप ग्लोबल टाईम्सने केला आहे. 

फेसबुकने दिला यूजरना धक्का​

बर्फाच्छादित काराकोरम पर्वत रांगेतील एका नदीकिनारी हा प्रकार घडला होता. चीनी सैनिक आणि भारतीय सैनिक आक्रमक झाल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. तसेच हातात काठ्या आणि ढालीसारखे फायबर प्रोटेक्टर घेऊन जाणारे चीनी सैनिकही दिसत आहेत. तसेच एका चीनी सैनिकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचेही दिसत आहे. दोन्ही देशाच्या सैनिकांमध्ये उडालेल्या या धुमश्चक्रीमध्ये काठी आणि दगडाचा वापर करण्यात आला होता. त्यात अनेकजण जखमीही झाले होते. 

गर्लफ्रेंडसाठी कायपण! बर्थडे गिफ्ट देण्यासाठी उंटाच्या 'बेबी'ला पळवलं​

चीनचं पितळ उघडं पडलं
भारतीय सैन्याने घुसखोरी केल्याचा चीनचा दावा फोल ठरला आहे. ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटेजिक पॉलिसी इन्स्टिट्यूटचे नाथन रुसर यांनी चीनचा खोटेपणा उघड केला आहे. सॅटेलाइन इमेजद्वारे त्यांनी हा निष्कर्ष काढला असून भारत-चीन सैन्यामध्ये जिथे हा रक्तरंजित संघर्ष झाला ती जागा सुमारे ५० मीटर आत भारतीय हद्दीत आहे.

धक्कादायक निर्णय! बलात्कार पिडीतेच्या वैद्यकीय तपासणीसाठी २५ हजार रुपये शुल्क​

दरम्यान, गेल्या वर्षी जून महिन्यात गलवान खोऱ्यात झालेली लढाई उभय देशांमधील भयंकर चकमकींपैकी एक असल्याचे बोलले जात आहे. या चकमकीत प्राण गमावलेल्या कमांडर चेन हाँगजून आणि अन्य तीन सैनिकांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आले असल्याचे चीनने जाहीर केले आहे. 

- जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: China Releases Galwan Valley Clash Video Shows Confrontation With Indian Troops