अमेरिकेतील नाइटक्लबवर गोळीबार; 1 ठार, 14 जखमी

वृत्तसंस्था
रविवार, 26 मार्च 2017

अज्ञात हल्लेखोरांनी अमेरिकेतील ओहायो येथील सिनसिनाटी शहरातील एका नाईट क्‍लबमध्ये केलेल्या गोळीबारात एक जण ठार तर 14 जण जखमी झाले आहेत.

न्यूयॉर्क : अज्ञात हल्लेखोरांनी अमेरिकेतील ओहायो येथील सिनसिनाटी शहरातील एका नाईट क्‍लबमध्ये केलेल्या गोळीबारात एक जण ठार तर 14 जण जखमी झाले आहेत.

शहरातील कॅमियो नाईटक्‍लबमध्ये आज (रविवार) सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला. यावेळी क्‍लबमध्ये शेकडो जण उपस्थित होते. गोळीबारानंतर प्रत्येक जण बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असल्याने क्‍लबमध्ये हल्लकल्लोळ माजला. या हल्ल्यात 15 जणांवर गोळीबार झाला. त्यापैकी एक जण मृत्युमुखी पडला असून अन्य 14 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आले नसल्याचेही त्यांनी सांगितले. "आम्हाला खात्री आहे की हल्लेखोर एकापेक्षा अधिक आहेत. मात्र या क्षणी ते दोन पेक्षा अधिक होते हे सांगता येणे शक्‍य नाही', असे पोलिसांनी सांगितले.

मागीलवर्षी फ्लोरिडातील ओरलॅंडोमधील नाइटक्‍लबवरही हल्ला झाला होता. त्यामध्ये 45 पेक्षा अधिक जण मृत्युमुखी पडले होते.

Web Title: One killed, 14 wounded in Ohio nightclub shooting

टॅग्स