रशिया, युक्रेनमध्ये मोदीचं प्रस्थापित करु शकतात शांतता; मेक्सिकोचा UNमध्ये दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pm modi

रशिया, युक्रेनमध्ये मोदीचं प्रस्थापित करु शकतात शांतता; मेक्सिकोचा UNमध्ये दावा

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्ध परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी आणि या दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या हेतूनं विशेष समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव मेक्सिकोनं संयुक्त राष्ट्रांसमोर मांडला आहे. विशेष म्हणजे यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समावेश असणार आहे. या दोन्ही देशांमध्ये कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी मोदीच प्रयत्न करु शकतील असंही मेक्सिकोनं युएनमध्ये म्हटलं आहे. (Only PM Modi can broker peace between Ukraine and Russia Mexico at UN)

हेही वाचा: Maharashtra Politics : CM शिंदे दिल्लीला गेले; जाताना लेकाला राज्याचा कारभार देऊन गेले?

खरंतर पंतप्रधान मोदींसह ख्रिश्चन धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस आणि युएनचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांचाही या समितीत समावेश करण्यात यावा असंही मेक्सिकोनं म्हटलं आहे. न्यूयॉर्क इथं युक्रेनमधील परिस्थितीबाबत आयोजित युएनच्या सिक्युरिटी काऊन्सिलच्या डिबेटमध्ये मेक्सिकोचे परराष्ट्र मंत्री मार्सेलो लुईस एब्रार्ड कॅसिबोन यांनी हा प्रस्ताव मांडला.

हेही वाचा: RSS : सरसंघचालक मोहन भागवतांना 'राष्ट्रपिता' म्हणणारे उमर अहमद इलियासी कोण आहेत?

दरम्यान, उझबेकिस्तानच्या समरकंद इथं शांघाई सहकार संघटनेची (SCO) 22वी बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत PM मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतिन यांची भेट झाली होती. यावेळी "आजचं युग हे युद्धाचं नाही," असं मोदींनी पुतिन यांना सांगितलं होतं. मोदींच्या या विधानाचं स्वागत अमेरिकेसह पश्चिमेकडील देशांसह फ्रान्स आणि युकेनंही केलं होतं.

Web Title: Only Pm Modi Can Broker Peace Between Ukraine And Russia Mexico At Un

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..