RSS : सरसंघचालक मोहन भागवतांना 'राष्ट्रपिता' म्हणणारे उमर अहमद इलियासी कोण आहेत?

भेटीनंतर इमाम इलियासी यांनी मोहन भागवतांचा ‘राष्ट्रपिता’ म्हणून उल्लेख केला आहे.
Mohan Bhagwat Umar Ahmed Ilyasi
Mohan Bhagwat Umar Ahmed Ilyasiesakal
Updated on: 
Summary

भेटीनंतर इमाम इलियासी यांनी मोहन भागवतांचा ‘राष्ट्रपिता’ म्हणून उल्लेख केला आहे.

RSS प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) गुरुवारी ‘ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशन’चे (All India Imam Organisation) प्रमुख इमाम उमर अहमद इलियासी (Umar Ahmed Ilyasi) यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. या भेटीतून मुस्लिमांशी संवाद प्रक्रिया कायम ठेवण्याचा प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून (RSS) केला जात असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, यावेळी मोहन भागवतांनी मदरशामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. इमाम इलियासी यांनी मोहन भागवतांना भेटीचं निमंत्रण दिलं होतं. यानंतर सरसंघचालक दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्गावरील (Kasturba Gandhi Route) मशिदीमध्ये इमामांची भेट घेण्यासाठी पोहोचले होते. या भेटीनंतर इमाम इलियासी यांनी मोहन भागवत यांचा ‘राष्ट्रपिता’ म्हणून उल्लेख केला.

Mohan Bhagwat Umar Ahmed Ilyasi
Congress : मनीष तिवारी, पृथ्वीराज चव्हाण पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची दाट शक्यता!

आम्ही दोघंही देशाच्या हितालाच प्राधान्य देतो - इलियासी

सरसंघचालक राष्ट्रपिता आहेत. त्यांच्या भेटीमुळं समाजामध्ये योग्य संदेश दिला गेला आहे. मानवता हा सर्वात मोठा धर्म आहे. आम्ही दोघंही देशाच्या हितालाच प्राधान्य देतो, असं इमाम इलियासी म्हणाले. त्यावर, मोहन भागवतांनी देशाचे राष्ट्रपिता एकच असून, आपण सर्व भारताची लेकरं आहोत, असं स्पष्ट केलं.

Mohan Bhagwat Umar Ahmed Ilyasi
Kerala : PFI विरोधातील कारवाईचे हिंसक पडसाद; वाहनांच्या तोडफोडीसह भाजप कार्यालयावर हल्ला

कोण आहेत उमर अहमद इलियासी?

डॉ. उमर अहमद इलियासी हे ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशन’चे (AIIO) प्रमुख आहेत. या संघटनेत 5 लाखांहून अधिक इमाम असल्याचा दावा केला जातो. डॉ. इलियासी 21 कोटी भारतीय मुस्लिमांचा आवाज असल्याचं मानलं जातं. AIIO ही जगातील सर्वात मोठी इमाम संघटना आहे. ही संघटना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त असल्याचा दावाही केला जातो.

Mohan Bhagwat Umar Ahmed Ilyasi
आमच्यावर ठासून अन्याय केला, आता तेवढाच मोठा आगडोंब उसळणार; भाजप आमदाराचा राष्ट्रवादीला इशारा

अलीकडंच डॉ. उमर अहमद इलियासी यांना पंजाबच्या भगत विद्यापीठानं डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे. भारतीय इतिहासात प्रथमच मशिदीच्या इमामाला एवढ्या मोठ्या पदवीनं सन्मानित करण्यात आलं आहे. डॉ. इलियासी यांना इस्लामिक कायद्यातील तज्ञ मानलं जातं. दहशतवाद आणि अतिरेकी यांवर स्पष्ट भूमिका मांडणाऱ्या काही इस्लामी विचारवंतांपैकी ते एक आहेत.

Mohan Bhagwat Umar Ahmed Ilyasi
Congress : गांधी घराण्यातील अध्यक्ष नको असं राहुल गांधींच म्हणालेत; गेहलोतांचा मोठा गौप्यस्फोट

'कायदा हातात घेणं योग्य नाही'

AIIO च्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, डॉ. उमर अहमद इलियासी यांना देशासह जगात शांतता आणि सलोख्यासाठी शेकडो पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. देशात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (CAA) विरोधात निदर्शनं होत होती, तेव्हा इलियासींनी एक निवेदन जारी करत म्हटलं होतं की, लोकांनी आधी CAA आणि NRC काय आहे समजून घ्यावं आणि त्यानंतरच शांततेनं आंदोलनं करावी, असं आवाहन केलं होतं. सरकारी मालमत्तेचं नुकसान करणं किंवा कायदा हातात घेणं योग्य नाही, असंही ते म्हणाले होते. उमर अहमद इलियासी यांनी याआधीही भागवत यांची भेट घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Breaking Marathi News live Updates
PM Kisan Beneficiary Status Check Online
Sugarcane price protest in Karnataka
Centre caps sugar stocks at 1,000 quintals for traders to curb hoarding during the festive season.
Marathi News Esakal
www.esakal.com