Oracle layoffs : AI मुळे नोकऱ्यांवर गंडांतर? सर्वात मोठ्या IT कंपनीने एका झटक्यात ३०००० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढल्याने खळबळ

Oracle Job cuts : अनेक कर्मचाऱ्यांना पहाटे ६ वाजता ईमेलद्वारे नोकरी संपल्याची माहिती देण्यात आली. काही प्रकरणांमध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता सिस्टम ॲक्सेस त्वरित बंद करण्यात आला. भारतात सुमारे १२,००० कर्मचाऱ्यांवर परिणाम झाल्याची शक्यता आहे.
Oracle Job cuts

Thousands of Oracle employees face sudden layoffs after early morning emails as the company shifts focus toward AI and cloud infrastructure.

esakal

Updated on

Oracle Job layoffs: माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे.या क्षेत्रातील दिग्गज कंपनी 'Oracle' ने कर्मचाऱ्यांची कपात सुरू केल्याचे वृत्त आहे, ज्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांवर परिणाम झाला आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, अनेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकरी संपण्याची सूचना देणारा ईमेल पहाटे ६:०० वाजताच प्राप्त झाला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वर कर्मचाऱ्यांनी सांगितले की, त्यांना अचानक एक ईमेल आला, ज्यामध्ये नमूद केले होते की कंपनीमधील त्यांचे पद आता अस्तित्वात राहिलेले नाही. कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय किंवा एचआर विभागाची बैठक अथवा मॅनेजरचा फोन न येताच कर्मचाऱ्यांचा सिस्टीम ॲक्सेस (प्रवेश) त्वरित काढून घेण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com