Encounter : लादेनचा मुलगा हमजा-बिन-लादेन ठार; ट्रम्प यांची माहिती

वृत्तसंस्था
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

हमजा हा गेल्या महिन्यातच मारला गेल्याचे अमेरिकी गुप्तचर संस्थांनी म्हटले होते. हमजाला कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या परिस्थितीत मारले, हे मात्र स्पष्ट करण्यात आलेले नाही.

वॉशिंग्टन : कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन याचा मुलगा आणि 'अल कायदा'चा म्होरक्‍या हमजा बिन लादेन हा अमेरिकी सैनिकांनी अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर केलेल्या कारवाईत मारला गेल्याचे स्पष्ट झाले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

- सौदीच्या तेलकंपनीवर ड्रोन हल्ला

हमजा हा गेल्या महिन्यातच मारला गेल्याचे अमेरिकी गुप्तचर संस्थांनी म्हटले होते. हमजाला कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या परिस्थितीत मारले, हे मात्र स्पष्ट करण्यात आलेले नाही. हमजाला मारल्यामुळे अल कायदाची मोठी हानी झाली असून, ही संघटना अद्यापही सक्रिय असल्याचेही यामुळे उघड होत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

अमेरिकेने 2011 मध्ये ओसामा बिन लादेनला पाकिस्तानमधील अबोटाबाद येथील एका कारवाईत ठार मारले होते.

- चिंताग्रस्त मातांची मुले अतिकृतीशील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osama Bin Ladens son Hamza Bin Laden killed by US army on Afghanistan Pakistan border operations