Oscars : सगळीकडे ऑस्करचीच चर्चा, मात्र Academy Awards च्या बाहुलीला “Oscars” नाव कसं पडलं माहितीये?

या मागे अनेक दावे अस्तित्वात आहेत. खरं कारण अजूनही कोणाला माहित नाही.
Oscars
Oscarsesakal

Oscars : यंदाचा ऑस्कर सोहळा हा फार खास ठरलाय. कारण यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात भारताने बाजी मारत देशाचे नाव उंचावले आहे. भारताने आपल्या नावे दोन पुरस्कार केलेत आहेत. देशासाठी आणि टीव्ही इंडस्ट्रीसाठी ही फार गर्वाची बाब असून अनेक टीव्ही स्टार्सनी यावर प्रतिक्रियासुद्धा दिल्या आहेत.

मात्र ऑस्कर अवॉर्ड्स हे नाव कसं अस्तित्वात आलं याची कल्पना तुम्हाला आहे काय? याबाबत अनेकांना कल्पना नाहीये. या मागे अनेक दावे अस्तित्वात आहेत. खरं कारण अजूनही कोणाला माहित नाही.

पण सर्वात प्रसिद्ध दावा असा आहे की, Academy Award ची librarian (ग्रंथपाल) आणि पुढे Academy of Motion Picture Arts and Sciences च्या संचालक पदी बसलेली Margaret Herrick हिने म्हटले होते की ही बाहुली तिचे काका ऑस्कर यांच्यासारखी दिसते.

ती हे उद्गार काढत असताना Sidney Skolsky हा लेखक तेथे उपस्थित होता आणि त्याने दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये त्याने एका लेखात असे लिहिले की एका कर्मचाऱ्याने प्रसिद्ध बाहुलीचे ‘ऑस्कर’ असे नामकरण केले आहे.

Sidney Skolsky ने त्याच्या Don’t Get Me Wrong, I Love Hollywood या १९७५ साली प्रकाशित झालेल्या आत्मचरित्रात असे म्हटले की, १९३४ साली New York Daily च्या लेखातून मला असे जाहीर करायचे नव्हते की बाहुलीला ऑस्कर नाव दिले गेले आहे. Margaret Herrick च्या प्रसंगाला जोडून मी एका प्रसिद्ध विनोदाचा संदर्भ देत Academy Awards चा उपहास करण्याचा प्रयत्न केला होता. तो विनोद होता, “Will you have a cigar, Oscar?”) पण पुढे सलग दोन वर्षे मी बाहुलीला अनवधानाने ऑस्कर असे म्हटले आणि अखेर त्याला तेच नाव देण्यात आले.

Oscars
Oscars 2023: धोतर आणि कुडता! ऑस्करमध्ये दिसून आला राजामौलींचा साधेपणा.. चाहत्यांकडून होतंय कौतुक..

मात्र पुढे सगळीकडे ऑस्कर हेच नाव प्रचलित झाले. Sidney Skolsky यानेच या बाहुलीचे ऑस्कर हे नामकरण केले. असेही अनेकांचे म्हणणे पडले.

आणखी एक दावा

दुसरा एक दावा प्रसिद्ध अभिनेत्री Bette Davis हिने केला होता. तिच्या म्हणण्याप्रमाणे तिने स्वत: सर्वात प्रथम Harmon O Nelson Jr या तिच्या पतीच्या नावामागे बाहुलीला ‘ऑस्कर’ असे संबोधले होते.

तिसरा दावा

अजून एका दाव्यामुळे हा गुंता अधिकच वाढतो. १९३४ मध्ये Time magazine मध्ये आलेल्या एका लेखामध्ये त्यावेळच्या Academy Awards समारंभाचा उल्लेख होता. या लेखात असा लेख प्रसिद्ध केला होता की Three Little Pigs साठी वॉल्ट डिस्नेला जेव्हा ऑस्कर मिळाला होता तेव्हा आभार मानताना त्याने बाहुलीला ऑस्कर असे संबोधले होते. (Oscar Awards)

Oscars
Oscars 2023: 'नाटू नाटू' ला ऑस्कर अन् भारतात आनंदाला पूर.. पुरस्कार मिळाल्यावर काय म्हणाले संगीतकार एम एम कीरावानी?.

असे हे तीन दावे आहेत, पण नेमका कोणत्या गोष्टीमुळे Academy Awards च्या बाहुलीला “Oscars” नाव पडलं हे अजूनही ठोसपणे कोणालाही सांगता येत नाही.

१६ मे १९२९ रोजी Academy Awards चा पहिला सोहळा आयोजित करण्यात आला होता. १९३९ सालापर्यंत त्या बाहुलीला अधिकृतपणे ऑस्कर असे संबोधण्यात येत नव्हते, परंतु पुढे जगभरात बाहुलीला त्याच नावाने ओळखले जाऊ लागले. तो एक ब्रँड झाला. म्हणून १९३९ नंतर Academy Awards च्या बाहुलीला अधिकृतरित्या Oscars असे संबोधण्यात येऊ लागले.

या बाहुलीच्या डिजाईनची संकल्पना MGM चे संचालक Cedric Gibbons यांच्या डोक्यात आली होती. एक सरदार जो हातामध्ये तलवार पकडून फिल्म रील वर उभा असेल, अश्याप्रकारची बाहुली बनवायची त्यांची कल्पना होती. फिल्म रील वर असलेले पाच स्पोक्स लेखक, दिग्दर्शक, कलाकार, निर्माता आणि तंत्रज्ञ यांचे प्रतिनिधित्व करतात. George Stanley या शिल्पकाराने ही बाहुली घडवली आहे. आताच्या ऑस्कर बाहुलीची लांबी १३.५ इंच असून वजन ८५ पौंड इतकी असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com