esakal | प्राण्यांनाही कोरोनाची लागण; अमेरिकेतील मत्स्यालयात कोरोनाचा शिरकाव

बोलून बातमी शोधा

otters covid 19 positive
प्राण्यांनाही कोरोनाची लागण; अमेरिकेतील मत्स्यालयात कोरोनाच शिरकाव
sakal_logo
By
शर्वरी जोशी

चीनच्या वुहान प्रांतातून उद्रेक झालेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण जगभराला विळखा घातला आहे. आतापर्यंत अनेक देशांमध्ये कोरोनाने शिरकाव केला असून अनेकांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहे. माणसांना होणाऱ्या या विषाणूचं स्वरुप दिवसेंदिवस भयानक होत असून आता या विषाणूची लागण प्राण्यांनादेखील होत असल्याचं समोर आलं आहे. अमेरिकेतील अटलांटा शहरामधील एका मत्स्यालयात ठेवण्यात आलेल्या ऑटर्स (Otters). या प्राण्याला कोरोनाची लागण झाली आहे.

अटलांटा शहरात असलेल्या जॉर्जिया मत्स्यालयात ठेवण्यात आलेल्या काही ऑटर्सला कोरोनाची लागण झाली आहे. याविषयी मत्स्यालयाकडून ट्विट करत ही माहिती देण्यात आली. ऑटर्स हा उभयचर प्राणी असून त्याची प्रजाती दुर्मिळ होत चालल्याचं पाहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी मत्स्यालयातील काही ऑटर्सला सर्दी झाली होती. ते सतत शिंकत होते व सोबतच त्यांना खोकलादेखील येत होता. तसंच त्यांच्यात जाणवत असलेली लक्षणं ही कोरोनाची असल्याचं मत्स्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. तसंच हे ऑटर्स एशियन स्मॉल क्लॉड ऑटर्स असल्याचंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचा: Corona virus: जाणून घ्या, मुंबईत कुठं उपलब्ध आहेत बेड

"मत्स्यालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांची टीम सध्या या ऑटर्सवर उपचार करत आहेत. या ऑटर्सला स्वतंत्र खोलीत ठेवण्यात आलं आहे. तसंच प्रशासन व वैद्यकीय टीम सातत्याने त्यांची काळजी घेत आहेत. तसंच योग्य ती खबरदारी घेतल्यानंतरही या ऑटर्सला कोरोनाची लागण झाली, याचा अर्थ ही लागण कोणत्या तरी व्यक्तीच्या माध्यमातून झाली आहे. त्यामुळे या ऑटर्सच्या संपर्कात दररोज येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली आहे", असं जॉर्जिया एक्वेरिअमचे animal and environmental health vice president डॉ. टोन्या क्लॉस यांनी सांगितलं.

हेही वाचा: ८ हजार फूट उंच हवेत गिटार वाजवत त्याने व्यक्त केलं देशप्रेम

दरम्यान, या पूर्वी २०२० मध्ये लुइविलेमधील प्राणीसंग्रहालयामधील स्नो लेपर्डलादेखील कोरोनाची लागण झाली होती. तसंच उटाह आणि विस्कॉन्सिनमध्ये हजारो मिन्स्क यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.