Dairy Farm Fire: डेअरी फार्ममध्ये भीषण स्फोट! १८ हजार गायींचा वेदनादायक मृत्यू

US Dairy Farm Fire
US Dairy Farm Fire

अमेरिकेतील टेक्सास येथील एका डेअरी फार्ममध्ये भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटोमुळे १८ हजार गायींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आग इतकी भीषण होती की संपूर्ण परिसरात धुराचे ढग पसरले होते. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या पथकाला अनेक तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले.

यूएसए टुडेच्या वृत्तानुसार, टेक्सासमधील डिमिटमधील साउथ फोर्क डेअरी फार्ममध्ये सोमवारी हा स्फोट झाला. यानंतर मोठ्या प्रमाणात आग लागली. आग रौद्ररुप धारण करेल याची कल्पना कुणालाही नव्हती. जेव्हा आग ओसरत होती तेव्हा गायींचे मृतदेह दिसायला लागले. यावेळी लोकांचे डोळे पाणावले. सायंकाळी उशिरापर्यंत सुमारे १८ हजार गायींचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

बहुतेक गायी होल्स्टीन आणि जर्सी गायी होत्या. स्फोट कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, काही उपकरणांमध्ये बिघाड झाल्याने हा प्रकार घडल्याची भीती व्यक्त होत आहे. टेक्सासचे अग्निशमन अधिकारी आगीच्या कारणाचा तपास करतील.

US Dairy Farm Fire
IMD Prediction : राज्यात पुन्हा अलर्ट! अवकाळी पावसासह गारपीटीचा अंदाज; 'या' जिल्ह्यांना धोक्याचा इशारा

आग ऐवढी भीषण होती की गायींना बाहेर काढण्याची संधी देखील मिळाली नाही. त्यामुळे या आगीत ९० टक्के गायींचा मृत्यू झाला. एका अंदाजानुसार, एका गायीची किंमत सरासरी २००० डॉलर (दीड लाख रुपयांपेक्षा जास्त) आहे.

US Dairy Farm Fire
Thackeray Group: ठाकरे गटातील आमदारावर मोठी कारवाई! १२५ जणांवर गुन्हा दाखल! काय आहे प्रकरण?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com