
नवी दिल्लीः पहलगाममधील क्रूर दहशतवादी हल्ल्याची सूत्रधार संघटना ‘द रेजिस्टन्स फ्रंट’ला (टीआरएफ) अमेरिकेने जागतिक दहशतवादी संघटनांच्या यादीत समाविष्ट केले आहे. पहलगामच्या हल्ल्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी पाकपुरस्कृत संघटनेवर झालेल्या या कारवाईचे भारताने स्वागत केले असून दहशतवादावर तडजोड होणार नाही या धोरणाचाही पुनरुच्चार केला आहे.