esakal | पाकिस्तानी लष्कराच्या तुकडीवर दहशतवादी हल्ला; अधिकाऱ्यासह ११ सैनिक ठार
sakal

बोलून बातमी शोधा

Pakistan Army

पाक लष्कराच्या तुकडीवर दहशतवादी हल्ला; अधिकाऱ्यासह ११ सैनिक ठार

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : पाकिस्तानमधील खैबर पख्तुन्वा या प्रातांत पाकिस्तानी लष्कराच्या तुकडीवर मोठा दहशतवादी हल्ला झाल्याचं वृत्त आहे. या हल्ल्यात पाकिस्तानच्या लष्करातील एक कॅप्टनसह ११ सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच या भागात काम करणाऱ्या काही स्थानिक लोकांना दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलं आहे. (Pak Army captain and 11 soldiers killed in terror attack in Khyber Pakhtunkhwa)

या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या लष्करी अधिकाऱ्याचं नाव कॅप्टन अब्दुल बसित असं असून स्थानिक मीडियाच्या माहितीनुसार, कॅप्टन बसित पाकिस्तान आर्मी रेस्क्यु मिशनचं नेतृत्व करत होते. त्याचबरोबर टेलिकॉम कंपनीचं काम करत असलेल्या सहा कर्मचाऱ्यांचं दहशतवाद्यांनी अपहरण करुन ओलीस ठेवलं आहे.

इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) आणि पाकिस्तानची राष्ट्रीय वृत्तवाहिनी जिओ टीव्ही यांनी दिलेल्या वृत्तानुसार, तीन दहशतवादी पाकिस्तानच्या लष्कराने दिलेल्या प्रत्युत्तरात मारले गेले आहेत. सध्या या भागात शोध मोहिम राबवण्यात येत आहे. ISPR हे पाकिस्तानी मिलिटरी मीडिया विंग आहे.

loading image