

Smoke rises over Kabul following a reported airstrike on a hospital facility, highlighting escalating tensions between Pakistan and Afghanistan.
esakal
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. पाकिस्तानने काबुलमधील एका रुग्णालयाला हवाई हल्ल्याचे लक्ष्य केल्याचा दावा अफगाणिस्तानने केला आहे. या हल्ल्यात ४०० लोकांचा बळी गेल्याचे आणि २५० हून अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. मात्र पाकिस्तानने हे आरोप ठामपणे फेटाळून लावले आहेत.