Video : काश्मीरवासीयांसाठी आम्ही काही करू शकतोः पाक

वृत्तसंस्था
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

पाकिस्तानी लष्कर काश्मीरवासीयांसोबत असून, त्यांच्यासाठी सदैव तयार आहे. काश्मीरवासीयांसाठी आम्ही काही पण करू शकतो,

कराची: जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटण्याचे निर्णय भारताने घेतला असला तरी काश्मीरचा मुद्दा अद्याप संपलेला नाही. आम्ही काही पण करू शकतो, असे पाकिस्तानी लष्करी अधिकाऱयाने म्हटले आहे.

पाकिस्तानी लष्कराचा प्रवक्ता आसिफ गफूर यांनी म्हटले आहे, 'कलम 370 व 35ए हटविण्याचा निर्णय घेतला असला तरी, काश्मीरचा मुद्दा संपलेला नाही. काश्मीरी नागिरकांचा संघर्ष जो पर्यंत यशस्वी होत नाही तो पर्यंत लढा चालूच राहिल. आम्ही काही पण करू शकतो.'

परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांनी म्हटले आहे की, 'कलम 370 व 35ए हटवून आंतरराष्ट्रीय कायद्याचे स्पष्टपणे उल्लंघन केले आहे.'

रावळपिंडी येथे पाकिस्तानी लष्कराची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. पाकिस्तानी लष्कर काश्मीरवासीयांसोबत असून, त्यांच्यासाठी सदैव तयार आहे. काश्मीरवासीयांसाठी आम्ही काही पण करू शकतो, असे एक लष्करी अधिकारी म्हणाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan Army officer statement about jammu kashmir article 370