पाकिस्तानवर कर्जाचा बोजा, सौदी अरबला मागणार मदत | Pakistan News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pakistan Economy

पाकिस्तानवर कर्जाचा बोजा, सौदी अरबला मागणार मदत

इस्लामाबाद : पाकिस्तान आर्थिक संकटातून जात आहे. देशाची परकीय गंगाजंजाळी घटत चालली असून नवीन कर्ज हवे आहे. दरम्यान पाकिस्तानचे नवीन पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) सौदी अरबच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात पाकिस्तान सौदी अरबला ३.२ अब्ज डाॅलरचे अतिरिक्त पॅकेज मागणार आहे. पंतप्रधान बनल्यानंतर शरीफ यांचा हा प्रथम पहिलाच दौरा आहे. त्याचा उद्देश सौदी अरबकडे (Saudi Arabia) कर्जाच्या माध्यमातून आर्थिक मदत घेण्याची आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या (Pakistan) स्थितीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. खुद शाहबाज शरीफ यांच्याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र जनतेला दिलेले आश्वसन ते कसे पूर्ण करतील. (Pakistan Ask 320 Million Dollar From Saudi Arabia)

हेही वाचा: 'मदरश्यांच्या माध्यमातून पाकिस्तान भारतातल्या दहशतवादाला प्रोत्साहन देतंय'

अगोदरच सौदीच्या कर्जाचा पाकिस्तानवर बोजा

जिओ न्यूजने पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवालाने सांगितले, की आम्ही सौदी अरबकडून जमा रक्कमला ३ बिलियन डाॅलरने वाढवून ५ बिलियन डाॅलर करणे आणि सौदी तेल सुविधेला १.२ बिलियन डाॅलरने २.४ बिलियन डाॅलर करण्याची विनंती करणार आहोत. अशा स्थितीत एकूण पॅकेज ७.४ बिलियन डाॅलरपर्यंत वाढवले जाऊ शकते. वृत्तानुसार पाकिस्तान सौदी अरबकडून जून २०२३ पर्यंत एक वर्षासाठी ४.२ बिलियन डाॅलरचे असलेले पॅकेजच्या रोलओवरसाठी अपील करणार आहे.

हेही वाचा: श्रीलंका आर्थिक संकटाच्या गर्तेत

इम्रान खानच्या सरकारच्या काळातही सौदीकडून कर्ज

इम्रान खान सरकारला सौदी अरबने स्टेट बँक ऑफ पाकिस्तानला अगोदरच ३ बिलियन डाॅलर कर्ज दिले होते. तसेच १.२ बिलियन डाॅलरचे डॅफर्ड पेमेंटवर तेलाची सुविधा दिली होती. कर्जाची रक्कम डिसेंबर २०२१ मध्ये दिली गेली होती. दुसरीकडे सौदीने तेल सुविधा मार्च २०२२ मध्ये सुरु केली होती. आतापर्यंत १०० मिलियन डाॅलरचे वितरण केले गेले आहे. सौदी अरबने ४.२ अब्ज डाॅलरच्या अंतिम पॅकेजची रक्कमेसह कडक अटी ठेवल्या होत्या. ते आयएमएफ कार्यक्रमाशी जोडले गेले होते.

Web Title: Pakistan Ask 320 Million Dollar From Saudi Arabia

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top