

Pakistan Bus Falls Into Ravine in Balochistan, 40 Killed
esakal
Bus Accident in Balochistan: बलुचिस्तानमधील दानासार परिसरात शुक्रवारी झालेल्या भीषण बस अपघातात किमान ४० प्रवाशांचा मृत्यू झाला, तर आठ जण गंभीर जखमी झाले. 'द एक्सप्रेस ट्रिब्यून'च्या वृत्तानुसार, क्वेट्टा येथून इस्लामाबादकडे निघालेली प्रवासी बस शेरानी-झोब महामार्गावरील डोंगराळ मार्गावरून घसरून खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेने पाकिस्तानमधील वाहतूक पायाभूत सुविधांबाबत आणि रस्ते सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत.