Balochistan Blast : पाकिस्तानात पुन्हा पुलवामा सारखा आत्मघाती हल्ला; बलुचिस्तानमध्ये ५ सुरक्षा जवानांसह ८ जणांचा मृत्यू

Mastung Attack : बलुचिस्तानमधील मस्तुंग जिल्ह्यातील कनाक परिसरातील कंदवाह लष्करी तपासणी नाक्यावर बंडखोरांनी स्फोटकांनी भरलेले वाहन धडकवून आत्मघाती हल्ला केला. या शक्तिशाली स्फोटात पाकिस्तानचे पाच सुरक्षा कर्मचारी आणि तीन नागरिक ठार झाले
Balochistan Blast : पाकिस्तानात पुन्हा पुलवामा सारखा आत्मघाती हल्ला; बलुचिस्तानमध्ये ५ सुरक्षा जवानांसह ८ जणांचा मृत्यू
Updated on: 

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात बंडखोरांनी पुन्हा एकदा भीषण आत्मघाती हल्ला केला आहे. मस्तुंग जिल्ह्यातील 'कनाक' परिसरात लष्करी तपासणी नाक्याला लक्ष्य करत स्फोटकांनी भरलेले वाहन धडकवण्यात आले. या शक्तिशाली स्फोटात पाकिस्तानचे पाच सुरक्षा कर्मचारी आणि तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मृत नागरिकांमध्ये दोन महिला आणि एका बालकाचा समावेश आहे. याशिवाय अनेक जण जखमी झाले असून परिसरातील घरांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या हल्ल्याचे स्वरूप भारतातील २०१९ मधील पुलवामा दहशतवादी हल्ल्याशी मिळतेजुळते असल्याने या घटनेची चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...