हाफीज सईदसह 38 जणांना पाकबाहेर जाण्यास बंदी

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

इस्लामाबाद- मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार व 'जमात-उद-दवा'चा म्होरक्या हाफिज सईदला पाकिस्तानबाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. सईद याच्यासह 'जमात'च्या 38 जणांच्या नावांची यादी पाकिस्तानच्या गृह खात्याने तयार केली आहे. 

हे सर्वजण 'लष्करे तैयबा' आणि 'जमात उद दावा'शी संबंधित असून, त्यांना देश सोडून जाण्यापासून रोखण्याचे आदेश सर्व सुरक्षा यंत्रणा व राज्य सरकारांना देण्यात आले आहेत.

सईदला 90 दिवसांसाठी नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, हाफिजसह 38 जणांची यादी तयार करण्यात आली असून, या सर्वांवर देश सोडून देण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये हाफिजसह अब्दुल्ला उबेद, जफर इक्बाल, अब्दुर रेहमान अबिद, काझी काशिफ नियाफ यांचा समावेश आहे. 

हाफिज सईदला नजरकैदेत ठेवले असले तरीही त्याच्याविरोधात ठोस पुरावे नसल्याचा कांगावा पाकिस्तान सरकारने केला आहे. हाफिजच्या राजकीय कार्यक्रमांच्या आधारावर भारत पाकिस्तानची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करीत आहे असा आरोप पाकिस्तानच्या गृह खात्याच्या प्रवक्त्यांनी केला आहे.
 
Web Title: Pakistan bans Hafiz Saeed and 38 others from travelling, protests escalate