Pakistan Crisis : मदत मिळूनही पाकिस्तानात महागाई कमी होईना; आता पेट्रोल-डिझेल पोहोचलं 300 रुपयांवर

Petrol-Diesel rate : पाकिस्तानच्या काळजीवाहू सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ केल्याची घोषणा केली आहे.
Pakistan Petrol Diesel Price
Pakistan Petrol Diesel PriceeSakal

पाकिस्तानमध्ये गेल्या काही महिन्यांपासून महागाई वाढत चालली आहे. काही दिवसांपूर्वी आयएमएफने पाकिस्तानला 3 अब्ज डॉलर्सची मदत दिली होती. मात्र, तरीही देशातील जनतेला दिलासा मिळालेला नाही.

पाकिस्तानच्या काळजीवाहू सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ केल्याची घोषणा केली आहे. आज (1 सप्टेंबर) पासून ही वाढ लागू होईल. पेट्रोलच्या किंमतीत सरकारने 14.91 रुपयांची वाढ केली आहे. यानंतर पेट्रोलची किंमत 305.36 रुपये (प्रति लीटर) एवढी झाली आहे. तर हाय स्पीड डिझेलची किंमतही 18.44 रुपयांनी वाढून 311.84 रुपये (प्रति लीटर) एवढी झाली आहे.

Pakistan Petrol Diesel Price
Pakistan News : पाकिस्तानात मोठा बॉम्बस्फोट, 11 मजूरांचा जागीच मृत्यू; दहशतवादी हल्ला असल्याची शक्यता

देशातील अर्थ मंत्रालयाने 31 ऑगस्टच्या रात्री उशीरा हा आदेश जारी केला. एक्स (ट्विटर) वरील आपल्या हँडलवरुन पोस्ट करत ही माहिती अर्थ मंत्रालयाने दिली. केरोसीन किंवा साध्या डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

सरकार बदलूनही फायदा नाही

यापूर्वी 15 ऑगस्ट रोजी अंतरिम सरकारने इंधनांच्या दरात 20 रुपये प्रति लीटर एवढी मोठी वाढ केली होती. तर पाकिस्तानमधील माजी सरकारने त्यापूर्वी 1 ऑगस्ट रोजी इंधनाचे दर वाढवले होते. एकंदरीत, सरकार बदलून किंवा मदत मिळूनही पाकिस्तानी जनतेला काहीही फायदा होताना दिसत नाहीये.

Pakistan Petrol Diesel Price
Pakistan Gadar 2 Reaction: गदर २ बद्दल पाकिस्तानी काय म्हणतायत? भन्नाट रिव्ह्यू व्हिडिओ व्हायरल

पाकिस्तानी रुपया कोसळला

आंतरराष्ट्रीय बाजारात पाकिस्तानी रुपया सातत्याने घसरताना दिसत आहे. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत गुरूवारी पाकिस्तानी रुपयाचं मूल्य घसरून 305.54 रुपयांच्या नीचांकी स्तरावर पोहोचलं. ऑगस्ट महिन्यात पाकिस्तानी रुपयामध्ये एकूण 6.2 टक्क्यांची घसरण दिसून आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com