esakal | भारतात राम मंदिर भूमिपूजनाचा उत्सव, तर पाकिस्तानात 'काळा दिवस'
sakal

बोलून बातमी शोधा

narendra_modi_and_imran_kha.jpg

भारत 5 ऑगस्ट रोजी जम्मू काश्मिरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवल्याचा पहिला वर्धापण दिन साजरा करण्याची तयारी करत आहे, तर दुसरीकडे सीमापार वेगळीच योजना बनवली जात आहे.

भारतात राम मंदिर भूमिपूजनाचा उत्सव, तर पाकिस्तानात 'काळा दिवस'

sakal_logo
By
वृत्तसंस्था

इस्लामाबाद- भारत 5 ऑगस्ट रोजी जम्मू काश्मिरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवल्याचा पहिला वर्धापण दिन साजरा करण्याची तयारी करत आहे, तर दुसरीकडे सीमापार वेगळीच योजना बनवली जात आहे. पाकिस्तानने 5 ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मिरचा विशेष दर्जा काढल्याच्या विरोधात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. भारताला आंतरराष्ट्रीय माध्यमात खोट्या स्वरुपात दाखवणे आणि काश्मिरी लोकांचा एकमेव तारणहार असल्याचं दाखवण्याचा पाकिस्तान प्रयत्न असणार आहे. 

रशियाकडून चीनला धक्का; भारताला मात्र वेळेवर पुरवठा होणार
पाकिस्तानने 5 ऑगस्ट रोजी काळा दिवस पाळण्याची योजना बनवली आहे. याच दिवशी भारताने जम्मू-काश्मीरला मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्णय घेतला होता. माहितीनुसार, या दिवशी आयएसआयचा पीआर विभाग काश्मिरी लोकांच्या समर्थनात एक ट्विट करणार आहे. पाकिस्तानमधील सर्व वर्तमानपत्रांमध्ये 5 ऑगस्ट रोजी विशेष अंक छापले जाणार आहेत. ज्यामध्ये भारताने केलेल्या कृतीचा निषेध केला जाणार आहे. शिवाय पाकिस्तानमधील सर्व न्यूज वाहिन्यांचे लोगो दिवसभरासाठी काळ्या रंगात दाखवले जाणार आहेत.  

पाकिस्तान आपल्या जनसंपर्क विभागाद्वारे भारताची नकारात्मक छबी दाखवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळेच पाकिस्तानने परदेशी मीडियाच्या दौऱ्याचे आयोजन केले आहे. भारताच्या ताब्यातील काश्मिरमध्ये रिपोर्टिंग करणे सोपे नसल्याचे दाखवणे हा दौऱ्याचा उद्धेश आहे. पाकिस्तान आयआसआयच्या पीआर विभागाने 4 ऑगस्टला एक  दौरा आयोजित केला आहे. पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मिरमध्ये कसे सर्व सुरळीत सुरु आहे आणि भारताच्या ताब्यातील काश्मिरमध्ये कसे निर्बंध लादण्यात आले आहेत, हे दाखवण्यासाठी पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सैन्य पर्यवेक्षक समूहाचा दौरा आयोजित केला आहे. 

पाकिस्तानने सर्व वाहिन्यांना या विषयावर विशेष कार्यक्रम प्रसारित करण्याचे निर्देश दिले आहेत. भारताने जबरदस्तीने घेतलेल्या भागाविरोधात संघर्ष, असं याला म्हणण्यात आलं आहे. भारताचे विरोधक असणारे काश्मीरी राजकीय नेते, कार्यकर्ते आणि आंतरराष्ट्रीय संघटना यांना पाकिस्तानकडून 5 ऑगस्टला विशेष ट्रिटमेंट देण्यात येणार आहे. काश्मिरवर आधारीत एक गीत वाहिन्यांवर दाखवले जाणार आहे. 

राम मंदिराच्या हजारो फूट खाली जमिनीत ठेवणार 'टाइम कॅप्सूल'
काश्मिरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय पटलावर नेण्यासाठी पाकिस्तानने जगातील आपल्या सर्व दुतावासांना कार्यक्रम आणि मोर्चाचे आयोजन करण्यास सांगितले आहे. यासंदर्भातील आदेश पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालय आणि आयएसआय यांनी संयुक्तपणे काढला आहे. पाकिस्तानातही अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.  इस्लामिक संघटनांनीही भारताविरोधात प्रतिक्रिया द्यावी यासाठी पाकिस्तान प्रयत्न करत आहे. तुर्कीचे राष्ट्रपती, मलेशियाचे प्रधानमंत्री आणि चिनी परराष्ट्र विभागाला भारताविरोधात ट्विट करण्याचे आवाहन केले आहे. 

(edited by-kartik pujari)

loading image