सियाचीन भागात जेट पाठविले: पाकचा दावा

वृत्तसंस्था
बुधवार, 24 मे 2017

'पाकिस्तानी हवाई दलाचे प्रमुख सोहेल अमान यांनी स्कार्डू येथील तळास भेट देत वैमानिक व इतर कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. अमान यांनी यावेळी स्वत: मिराज जेट उडविले,'' असे वृत्त पाकिस्तानी माध्यमांकडून देण्यात आले होते

नवी दिल्ली - सियाचीन भागामध्ये आलेल्या पाकिस्तानी विमानाने भारतीय हद्दीमध्ये प्रवेश केल्याचा दावा भारतीय हवाई दलाने आज (बुधवार) फेटाळून लावला.

पाकिस्तानकडून "सियाचीन ग्लेशियर'जवळ विमाने पाठविल्याचा दावा करण्यात आला आहे. पाकिस्तानमधील सर्व हवाई तळ हे पूर्ण क्षमतेने कार्यरत असून "मिराज जेट' विमानांनी प्रात्यक्षिके केल्याचे वृत्त तेथील माध्यमांनी पाकिस्तानी हवाई दलाचा हवाला देत दिले होते. "पाकिस्तानी हवाई दलाचे प्रमुख सोहेल अमान यांनी स्कार्डू येथील तळास भेट देत वैमानिक व इतर कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. अमान यांनी यावेळी स्वत: मिराज जेट उडविले,'' असे वृत्त पाकिस्तानी माध्यमांकडून देण्यात आले होते.

भारतीय हवाईदल प्रमुख बी एस धनोआ यांनी नुकतेच भारतीय हवाई दलामधील प्रत्येक वैमानिकासाठी लिहिलेल्या पत्रामध्ये कारवाईसाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानकडून हा दावा करण्यात आला आहे. मात्र पाकिस्तानने भारतीय हद्दीमध्ये प्रवेश केल्याचा दावा भारताकडून फेटाळून लावण्यात आला आहे.

Web Title: Pakistan claims to have sent a Jet in Siachen