

pakistan news
esakal
Pakistan youth rebellion: भारतामध्ये झालेल्या तरुणांच्या तीव्र आंदोलनांचा धसका आता पाकिस्तानातही घेतला जात असल्याचे दिसून येत आहे. पाकिस्तानात नव्याने ‘कॉकरोच पार्टी’ लाँच झाली आहे. तरुणांच्या या संघटनेमुळे तेथील सरकारचे धाबे दणाणले आहेत. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनी देशातील बिघडलेल्या व्यवस्थेवर तीव्र चिंता व्यक्त करत, देशात मोठे बंड होऊ शकते, अशी भीती जाहीरपणे व्यक्त केली आहे.