पाकिस्तानचा यापुढेही काश्मीरला पाठिंबा- शरीफ

वृत्तसंस्था
सोमवार, 10 ऑक्टोबर 2016

पाकव्याप्त काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर शरीफ लष्कराबरोबरच कोणत्या ना कोणत्या संघटना व पक्षांची बैठक घेऊन चर्चा करताना दिसत आहेत. 

इस्लामाबाद- आम्हाला थांबविण्याची ताकद जगात कोणाकडेही नाही. यापुढेही काश्मरीला आमचा पाठिंबा राहील, असे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आज (सोमवार) म्हटले आहे.

जम्मू-काश्मीरमधील उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईक घडवून आणले. यातूनही धडा न घेता पाकिस्तानमधील नेते भारतविरोधी वक्तव्ये करताना दिसतात. 

शरीफ म्हणाले, ‘काश्मरीमधील नागरिकांची सुटका करण्यासाठी स्वातंत्र्य चळवळ यापुढेही सुरूच राहून पाकिस्तानचा त्यांना पाठिंबा असेल. दहशतवाद व स्वातंत्र्य चळवळ याबाबत भारत चुकीची भूमिका घेत आहे. काश्मीरमधील नागरिक स्वातंत्र्य मिळविण्यासाठी लढा देत आहेत, आमचा त्यांना पाठिंबा आहे. आम्हाला थांबविण्याची ताकद जगात कोणाकडेही नाही.‘

दरम्यान, पाकव्याप्त काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर शरीफ लष्कराबरोबरच कोणत्या ना कोणत्या संघटना व पक्षांची बैठक घेऊन चर्चा करताना दिसत आहेत. 

Web Title: Pakistan to continue supporting Kashmir, says Nawaz Sharif