EX-PM Imran Khan: माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तान न्यायालयाकडून जामीन मंजूर

8 फेब्रुवारी 2024 रोजी होणार्‍या पाकिस्तान संसदीय निवडणुकीपूर्वी माजी पंतप्रधानांचा जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.
imran khan
imran khanesakal

EX-PM Imran Khan: सायफर प्रकरणात (Cypher Case) पाकिस्तानच्या न्यायालयाने माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे प्रमुख इम्रान खान यांना जामीन मंजूर केला आहे, अशी माहिती जिओ टीव्हीने दिली आहे.

8 फेब्रुवारी 2024 रोजी होणार्‍या पाकिस्तान संसदीय निवडणुकीपूर्वी माजी पंतप्रधानांचा जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.

इस्लामाबाद उच्च न्यायालयाने त्यांचा तुरुंगातील खटला रद्दबातल ठरवल्यानंतर अधिकृत गुपिते कायदा 2023 अंतर्गत स्थापन केलेल्या विशेष न्यायालयाने या महिन्याच्या सुरुवातीला PTI संस्थापकाला पुन्हा सिफर प्रकरणात दोषी ठरवले होते.

तोशाखाना प्रकरणात दोषी ठरल्यानंतर इम्रान खान ऑगस्टपासून तुरुंगात आहेत. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने इम्रान खानचा तुरुंगातील खटला रद्दबातल ठरवल्यानंतर पीटीआयचे संस्थापक इम्रान यांना या महिन्याच्या सुरुवातीला अधिकृत गुपिते कायदा 2023 अंतर्गत स्थापन केलेल्या विशेष न्यायालयाने सायफर प्रकरणात पुन्हा दोषी ठरवले होते.

imran khan
Rahul Gandhi: 'संसदेत घुसखोरी झाली तेव्हा भाजप खासदार पळून गेले', सुरक्षेतील त्रुटींवर राहुल गांधींनी दिली प्रतिक्रिया

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश (ADSJ) हुमायून दिलावर यांनी तोशाखाना प्रकरणात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी दोषी ठरवून तीन वर्षांचा तुरुंगवास आणि 1,00,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. इम्रान खान हे पंतप्रधान म्हणून आपल्या पदाचा गैरवापर करून 140 दशलक्ष (USD 490,000) पेक्षा जास्त किमतीच्या सरकारी भेटवस्तू विकल्याबद्दल दोषी आढळले होते, जे त्यांना त्यांच्या परदेश दौऱ्यांदरम्यान परदेशी मान्यवरांकडून मिळाले होते. (Latest Marathi News)

गेल्या वर्षी एप्रिल 2022 मध्ये इम्रान खान यांना अविश्वास प्रस्तावाद्वारे पंतप्रधानपदावरून हटवण्यात आले होते. यानंतर, 9 मे 2023 रोजी, पाकिस्तानच्या पुरुष क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू इम्रान खान याला नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो (NAB) ने भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक केली.

imran khan
Corona Update: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनं अॅलर्ट मोडवर; आरोग्य मंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com