ख्रिश्‍चन घरांची जाळपोळप्रकरणी 115 जणांची निर्दोष मुक्तता

वृत्तसंस्था
सोमवार, 30 जानेवारी 2017

लाहोर : जोसेफ कॉलनीतील ख्रिश्‍चन कुटुंबीयांच्या सुमारे शंभर घरांची जाळपोळ केल्याप्रकरणी अटक केलेल्या 115 संशयितांची आज पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.

या प्रकरणावर शनिवारी अंतिम सुनावणी झाली. न्यायाधीश चौधरी मोहंमद आझम यांनी संशयितांच्या वकिलाचा युक्तिवाद मान्य करीत हा निर्णय दिला. फिर्यादींनी सादर केलेले पुरावे ठोस नसल्याने संशयितांना कोणती शिक्षा ठोठावता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

8 मार्च 2013 मध्ये हा प्रकार घडला होता. हजारोंच्या जमावाने जोसेफ कॉलनीला लक्ष्य करीत सुमारे 125 घरे, वाहने, दुकाने व चर्चला आग लावून दिली होती. जमावाला हटविताना केलेल्या कारवाईत पोलिस कर्मचाऱ्यांसह अनेक जण जखमी झाले होते. या घटनेनंतर अनेक ख्रिश्‍चन कुटुंबीयांनी तेथून स्थलांतर केले होते.

Web Title: pakistan court releases 115 accused in burning christian colony