esakal | दाऊन इब्राहिमवरून आता पाकिस्तानचा यूटर्न
sakal

बोलून बातमी शोधा

pakistan denies presence dawood ibrahim in karachi

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या निवेदनात म्हटलं की, दहशतवादी संघटनांवर बंदी घालण्याच्या आदेशावरून पाकिस्तानी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेलं वृत्त निराधार आहे.

दाऊन इब्राहिमवरून आता पाकिस्तानचा यूटर्न

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

इस्लामाबाद : बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनांची यादी जाहीर केल्यानंतर काही तासांतच पाकिस्ताने (Pakistan) यूटर्न घेतला आहे. यादीमध्ये कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचं (Dawood Ibrahim) नाव होतं. त्यामुळं दाऊद पाकिस्तानातच असल्याचं पाकिस्ताननं अप्रत्यक्षपणे कबुल केलं होतं. परंतु, आता बंदी घालती याचा अर्थ दाऊद पाकिस्तानात आहे, असा नाही, असा अजब दावा पाकिस्तानकडून करण्यात आलाय. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं याबाबत स्पष्टीकरण दिलंय.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काय आहे दाऊदचा पत्ता?
दहशतवाद्यांना पुरवण्यात येणारा पैसा रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर फायनान्शिअल ऍक्शन टास्क फोर्स (FATF) ही संस्था काम करते. या संस्थेने 2018मध्ये दहशतवाद्यांना आश्रय दिल्याप्रकरणी पाकिस्तानचा समावेश ग्रे लिस्टमध्ये केला होता. या समावेशामुळं पाकिस्तानला इतर देशांकडून होणारी आर्थिक आणि इतर कोणत्याही स्वरूपाची मदत बंद होऊ शकते. त्यामुळं या कारवाईपासून वाचण्यासाठी पाकिस्ताननं शक्कल लढवली असून, 88 दहशतवादी संघटनांवर बंदी जाहीर केली. त्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाचा समावेश होता. या यादीमध्ये दाऊद इब्राहिमची मालमत्ता कराचीमध्ये असून, तो कराचीत सौदी मशिदीजवळ राहत असल्याचंही सांगण्यात आलं होतं. कराचीतील नूराबाद परिसरात, 30 स्ट्रिट-डिफेन्स हाऊसिंग अथॉरिटी असा दाऊदचा पत्ता असल्याचं यादीत म्हटलं होतं.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पाकिस्तानं काय केला खुलासा?
दाऊद पाकिस्तानातच असल्याचं वृत्त काल भारतीय आणि पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमधून धडकलं होतं. परंतु, हे वृत्त निराधार असल्याचा दावा आता पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं केलाय. या संदर्भात परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या निवेदनात म्हटलं की, दहशतवादी संघटनांवर बंदी घालण्याच्या आदेशावरून पाकिस्तानी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेलं वृत्त निराधार आहे. विशेष म्हणजे, या आदेशावरून भारतातील काही मध्यमांनी वेगळेच तर्क लावले आहेत. त्यांच्या देशातील वाँटेड लिस्टमध्ये असलेल्या व्यक्ती (दाऊद इब्राहिम) पाकिस्तानात असल्याचं या आदेशातून मान्य करण्यात आल्याचा तर्क लावण्यता आलेला आहे. त्याला कोणताही आधार नाही आणि हे वृत्त दिशाभूल करणारं आहे.