पाकिस्तानची बालीशपणाची हद्द; काश्मिर ताब्यात घेण्याचे पाहतोय स्वप्न

सकाळ वृत्तसेवा
Friday, 31 July 2020

जम्मू-काश्मीरला लागू असलेले कलम 370 हटवण्यात आल्याने पाकिस्तानला चांगलीच मिरची लागली आहे.

इस्लामाबाद- 5 ऑगस्ट रोजी भारताने जम्मू-काश्मीरला असलेला विषेष दर्जा काढून घेण्याचा निर्णय घेतला होता. या घटनेच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान काळा दिवस पाळण्याची तयारी करत आहे. त्यादृष्टीने पाकिस्तानने 5 ऑगस्ट रोजी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या माध्यमातून पाकिस्तान भारताच्या कृतीचा विरोध करणार आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला बदनाम करण्यासाठी पाकिस्तान सर्व प्रयत्न करत आहे. जम्मू-काश्मीरला लागू असलेले कलम 370 हटवण्यात आल्याने पाकिस्तानला चांगलीच मिरची लागली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह  महमूद कुरैशी यांनी इस्लामाबाद येथील काश्मीर हायवेचे नाव बदलून श्रीनगर करणार असल्याचे जाहीर केले आहे.

कोरोना लसीपासून आपण किती दूर? जाणून घ्या जगभरातील सद्यस्थिती

महमूद कुरेशी यांनी काश्मीर पाकिस्तानात येणार असल्याचे स्वप्न पाहिल्याचं दिसत आहे. काश्मीर हाईवेचं नामांतर श्रीनगर करण्यात येत आहे, कारण मला विश्वास आहे की हा हाईवे आपल्याला एक दिवस श्रीनगरला घेऊन जाणार आहे, असं ते म्हणाले आहेत.  कुरैशी यांनी यावेळी काश्मीरच्या मुद्दा उपस्थित करत भारतावर आगपाखड केली. 

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील प्रमुख रस्त्यांपैकी एक काश्मीर हाईवे आहे. हा हाईवे इस्लामाबादच्या पश्चिमेला असणाऱ्या पाकिस्तान आंतरराष्ट्रीय विमानतळाला पूर्वेला असणाऱ्या ई-25 हाईवेला जोडतो. या हाईवेची एकूण लांबी 25 किलोमीटर आहे. आता या हाईवेला श्रीनगर असं नाव देऊन पाकिस्तान काश्मीर आपल्या ताब्यात घेण्याचे स्वप्न पाहात आहे. 

पाकिस्तानने 5 ऑगस्ट रोजी काळा दिवस पाळण्याची योजना बनवली आहे. याच दिवशी भारताने जम्मू-काश्मीरला मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्णय घेतला होता. माहितीनुसार, या दिवशी आयएसआयचा पीआर विभाग काश्मिरी लोकांच्या समर्थनात एक ट्विट करणार आहे. पाकिस्तानमधील सर्व वर्तमानपत्रांमध्ये 5 ऑगस्ट रोजी विशेष अंक छापले जाणार आहेत. ज्यामध्ये भारताने केलेल्या कृतीचा निषेध केला जाणार आहे. शिवाय पाकिस्तानमधील सर्व न्यूज वाहिन्यांचे लोगो दिवसभरासाठी काळ्या रंगात दाखवले जाणार आहेत.  

दारु मिळाली नाही म्हणून पिलं सॅनिटायझर; 9 लोकांचा मृत्यू

पाकिस्तान आपल्या जनसंपर्क विभागाद्वारे भारताची नकारात्मक छबी दाखवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळेच पाकिस्तानने परदेशी मीडियाच्या दौऱ्याचे आयोजन केले आहे. भारताच्या ताब्यातील काश्मिरमध्ये रिपोर्टिंग करणे सोपे नसल्याचे दाखवणे हा दौऱ्याचा उद्धेश आहे. पाकिस्तान आयआसआयच्या पीआर विभागाने 4 ऑगस्टला एक  दौरा आयोजित केला आहे. पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मिरमध्ये कसे सर्व सुरळीत सुरु आहे आणि भारताच्या ताब्यातील काश्मिरमध्ये कसे निर्बंध लादण्यात आले आहेत, हे दाखवण्यासाठी पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सैन्य पर्यवेक्षक समूहाचा दौरा आयोजित केला आहे. 

पाकिस्तानने सर्व वाहिन्यांना या विषयावर विशेष कार्यक्रम प्रसारित करण्याचे निर्देश दिले आहेत. भारताने जबरदस्तीने घेतलेल्या भागाविरोधात संघर्ष, असं याला म्हणण्यात आलं आहे. भारताचे विरोधक असणारे काश्मीरी राजकीय नेते, कार्यकर्ते आणि आंतरराष्ट्रीय संघटना यांना पाकिस्तानकडून 5 ऑगस्टला विशेष ट्रिटमेंट देण्यात येणार आहे. काश्मिरवर आधारीत एक गीत वाहिन्यांवर दाखवले जाणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan dream of capturing Kashmir planing for new scheme