...आम्ही वाहनं आता पेटवायची का?

pakistan ECC allows hike in price of petrol
pakistan ECC allows hike in price of petrol

इस्लामाबादः पाकिस्तानच्या आर्थिक समन्वय समितीची (ECC) बैठक शुक्रवारी (ता. 4) पार पडली असून, देशात मे महिन्यात पेट्रोलियम उत्पादनांच्या किंमतींत 9 रुपये प्रती लीटरपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. पेट्रोलचा दर 108 रुपये प्रति लिटर झाला आहे. इंधनाचे वाढते दर पाहता आम्ही वाहने पेटवायची का? असा सवाल सर्वसामान्य नागरिक व्यक्त करू लागले आहेत.

पाकिस्तानच्या अर्थव्यवस्था कोलमडल्यामुळे दैनंदिन वापराच्या वस्तूंचे दरही भरमसाठ वाढले आहेत. पाकिस्तानमध्ये महागाईचा दर 9.41 टक्‍क्‍यांवर पोहचला आहे. भाज्या आणि दुधांच्या वाढत्या किंमतीनंतर  पेट्रोल-डिझेलचा भार पडतोय. पुढच्या काही दिवसांत हा भार आणखीनच वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पाकिस्तानच्या आर्थिक समन्वय समितीची बैठकीत पेट्रोलियम उत्पादनांच्या किंमतींत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. देशात मे महिन्यात पेट्रोलियम उत्पादनांच्या किंमतींत 9 रुपये प्रती लिटरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

वाढत्या दरानुसार पेट्रोल प्रती लिटर 108 तर डिझेल 132 रुपये प्रती लिटर झाले आहे. रॉकेलच्या किंमतीत 7.46 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याचे कारण समितीने पुढे केले आहे.

दरम्यान, पाकिस्तानमध्ये इंधनाचे दर परवडत नसल्यामुळे गाढवांच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. गाढवांच्या मागणीनंतर आता दुधाचे दर गगणाला पोहचले आहेत. दुधाच्या दरात प्रति लिटर 23 रुपयांनी वाढ झाल्यामुळे विविध भागामध्ये नागरिकांना लिटरमागे 120 ते 180 रुपये मोजावे लागत आहेत. इंधनाच्या वाढत्या दरामुळे सर्व सामान्य नागरिकांना वाहने परवडत नाहीत. महागाईने मेटाकुटीला आलेल्या जनतेला इंधन दरवाढीचा मोठा फटका बसत आहे. सर्वसामान्य नागरिकांना इंधनाचे दर परवडत नसल्यामुळे वाहतूकीसाठी गाढवांचा वापर केला जातो. यामुळे गाढवांना मोठी मागणी आहे. प्रचंड महागाईने नागरिकांमध्ये असंतोष पसरताना दिसत आहेत. दरम्यान, पुलवामा हल्ल्यानंतर भारतानेही पाकिस्तानला शेतमालाचा पुरवठा बंद केला होता. त्यावेळी पाकिस्तानमध्ये टोमॅटोचे दर 200 रुपये प्रति किलोपर्यंत वाढले होते. भारताने पाकिस्तानला टोमॅटोचा पुरवठा बंद केल्याने ही भाववाढ झाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com