पाकिस्तानात भारतीय टीव्ही, रेडिओवर पूर्ण बंदी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

इस्लामाबाद- पाकिस्तानने भारतीय टीव्ही वाहिन्या आणि रेडिओवरील सर्व प्रकारच्या कार्यक्रमांवर संपूर्ण बंदी घातली आहे. या बंदीचे उल्लंघन करताना कोणी आढळल्यास त्यांचा परवान रद्द करण्यात येणार आहे. 

भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान सध्या असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या माध्यम नियमन करणाऱ्या प्राधिकरणाने शुक्रवारपासून बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. 

पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी ऑथॉरिटी (PEMRA) या संस्थेने पाकिस्तान सरकारच्या सूचनेनुसार भारतीय कार्यक्रमांवर 21 ऑक्टोबरपासून बंदी घालण्याचे ठरविले आहे. 
"ही बंदी 21 ऑक्टोबर रोजी 3 वाजल्यापासून अंमलात येईल. जे यापश्चात कार्यक्रमांचे प्रसारण करतील त्यांना कारणे दाखवा नोटीस न देता परवाने रद्द करण्यात येतील," असे PEMRA या संस्थेने म्हटले आहे. 
 
Web Title: pakistan to enforce complete ban on indian tv content from friday