esakal | पाकिस्तानच्या पायाखालची वाळू सरकली; लष्कराने हॉस्पिटलना दिले आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

pakistan fears strike from india

पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांनी जून महिन्याच्या सुरुवातीला पाकव्याप्त काश्मीरमधील आरोग्यमंत्र्यांना एक पत्र लिहले आहे.  त्यामध्ये त्यांनी रुग्णालयातील 50 टक्के बेड सैनिकांसाठी तयार ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

पाकिस्तानच्या पायाखालची वाळू सरकली; लष्कराने हॉस्पिटलना दिले आदेश

sakal_logo
By
वृत्तसंस्था

इस्लामाबाद- भारत आणि चीनमध्ये सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान लष्करात भीतीचे वातावरण पसरल्याचं दिसत आहे. कारण पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांनी पाकव्याप्त काश्मीरमधील रुग्णालयातील 50 टक्के बेड आरक्षित ठेवण्यास सांगितल्याचं कळत आहे. त्यामुळे चीनसोबत सुरु असलेल्या वादाचा फायदा घेत भारत पाकिस्तानमध्ये मोठी कारवाई घडून आणेल अशी भीती पाक लष्कराला सतावत असल्याचं दिसत आहे.  

काय आहे राजीव गांधी फाउंडेशन? चीनकडून पैसे घेतल्याचा भाजपने केलाय आरोप
पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांनी जून महिन्याच्या सुरुवातीला पाकव्याप्त काश्मीरमधील आरोग्यमंत्र्यांना एक पत्र लिहले आहे.  त्यामध्ये त्यांनी रुग्णालयातील 50 टक्के बेड सैनिकांसाठी तयार ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच रक्तसाठा मुबलक प्रमाणात ठेवण्यास सांगितलं आहे. यावरुन पाकिस्तान मोठ्या काईवाईला सामोरे जाण्याची तयारी करत असल्याचं दिसत आहे.

'आझाद जम्मू आणि काश्मीरातील सर्व रुग्णालयातील 50 टक्के बेड पाकिस्तानी सैन्यासाठी तात्काळ तयार ठेवा. तसेच आपातकालिन स्थितीसाठी रक्ताचा साठा करुन ठेवा', असं  लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांनी पाकव्याप्त काश्मिरचे आरोग्यमंत्री डॉ. मुहमद नजीब नाकी खान यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. 

मेहुल चोकसीकडून पैसे का घेतले? भाजपचा काँग्रेसला सवाल
काही दिवसांपूर्वीच भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर रक्तरंजित संघर्ष पाहायला मिळाला होता. यात भारताचे 20 जवान हुतात्मा झाले होते. तर चीनचे 43 जवान मारले गेल्याचं भारत सरकारने सांगितलं आहे. अजूनही उभय देशांचे सैनिक एकमेकांसमोर उभे ठाकले असल्याने स्फोटक स्थिती कायम आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तान करत असलेल्या तयारीला महत्व प्राप्त झालं आहे.

दरम्यान, पाकिस्तानी सैन्याकडून नियंत्रण रेषेवर वेळोवेळी शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत आहे. शुक्रवारी तीन दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी कंठस्थान घातले होते. गेल्या काही दिवसात भारतीय जवानांनी अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. पाकिस्तानने नेहमीच दहशतवाद्यांना पोसण्याचे काम केले आहे. हे पाक पुरस्कृत दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आले आहेत. मात्र, भारतीय जवानांनी वेळोवळी अशा दहशतवादी कारवायांना हाणून पाडत खोऱ्यात शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे.